औषधांवर खर्च करण्यापेक्षा माणसांच्या आरोग्यावर खर्च करा-महाव्यवस्थापक एस.के.माहुली, ब्ल्यू क्रास लँबोरँटोरिज, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

नाशिक -  औषधांवर खर्च करण्यापेक्षा माणसांच्या आरोग्यावर खर्च करा, हे ब्रीद घेऊन समाजकार्यात अग्रेसर असलेल्या अंबड येथील ब्ल्यू क्रॉस लॅबोरॅटोरिज्  लि . या कंपनीने  कार्पोरेट सोसिअल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत  येथील दिलासा केअर सेंटर या वृद्धांचे सांभाळ  करणाऱ्या संस्थेस पाच लाख रुपयांची मदत केली आहे .
याप्रसंगी बोलताना कंपनीचे माजी महाव्यवस्थापक एस के माहुली म्हणाले की , कंपनीच्या स्थापनेपासूनच कंपनीचे अध्यक्ष एन एच इसरानी हे नाशिक आणि परिसरात चांगले काम करणाऱ्या संस्थांना मदत करण्यास नेहमीच तयार असतात. कंपनीने आतापर्यंत विविध शैक्षणिक संस्थांमधील गरजू विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती , महिंद्रा आणि महिंद्रा च्या नन्हीं कली या उपक्रमास हातभार , दिव्यांग मुलांसाठी विविध संस्थांना मदत  तसेच ई  लर्निंगसाठी जिल्ह्यातील १८ शाळांना ३६ डिजिटल सेट्स दिले आहेत . गुरुजी रुग्णालयास डायलिसिस मशीन , रुग्ण सहायता निधी , नाशिक महानगरपालिकेच्या विविध शाळांमधील अनेमिया आणि थायलॅसेमिया आजाराने ग्रस्त मुलांसाठी रक्त तपासणी शिबीर अशा अनेक उपक्रमांबरोबरच शाळाबाह्य गरीब मुला  मुलींना नर्सिंग , प्लम्बिंग , मोटर मेकॅनिक , मोबाईल रिपेअरिंग आदी बाबत प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिले . खेडे गावांना शुद्ध पाण्यासाठी आरो प्लांट , शौचालय बांधणी , बंधारे दुरुस्ती अशा अनेक क्षेत्रात कंपनीने भरीव मदत केली आहे .  दिलासा केअर सेंटर अंथरुणाला खिळलेल्या रुग्नांचा सांभाळ करण्याचे काम खूप सेवाभावी पद्धतीने करत असल्याने त्यांना आम्ही ही मदत करत असल्याचे ते म्हणाले. यावेळी माहुली यांनी केअर सेंटर मधील वृद्धा वत्सला मराठे यांच्याकडे पाच लाखांचा धनादेश सुपूर्द केला . यावेळी गोविंदनगर रहिवासी संघाचे संस्थापक अशोक कुलकर्णी, गोविंद नगर जेष्ठ नागरिक संघाचे सचिव ओमप्रकाश शर्मा हे उपस्थित होते . दिलासा केअर सेंटरच्या अध्यक्षा सौ उज्ज्वला जगताप यांनी कंपनीचे आभार मानले .

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ! ८ जानेवारीला देशव्यापी संप !! अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!