आयुक्तांच्या कार्यशैलीच्या विरोधी भूमिका सहाय्यक आयुक्तांकडून घेतली जात आहे का, असा प्रश्न नासिकरांकडून उपस्थित केला जात आहे, !! सविस्तर प्रश्न जाणण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

 
             नासिक पोलीस आयुक्त डाँ.रविंद्रकुमार सिंघल यांची आजपर्यंतची कार्यपद्धती हि नासिककरांच्या अंगवळणी पडली व कौतुकही होत आहे , ती सामाजिक पोलीसींग च्या माध्यमांतून राबविलेल्या उपक्रमांची. तिचे नासिककर मनापासुन स्वागत करीत आहेत. याऊलट शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल नासिककरांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
      शहर वाहतूक शाखेचे चार विभाग केले आहेत, वाहने टोईंग करणे विभाग एकमध्ये केले जात आहे, कारण टोईंग केलेल्या वाहनांना जमा करण्यासाठी इतर तीन विभागांत जागा नाही व ती लवकरांत लवकर उपलब्ध करण्याचे त्यांनी जाहीर केले.
            यासंदर्भात शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना मनपाच्या महासभेस उपस्थित रहावे लागते, तसेच वेळोवेळीही त्यांचा मनपाशी कायम संपर्क असतो तरीही त्यांनी मनपाशी पार्कींग झोनबाबत यंयुक्तपणे प्रयत्न करण्याऐवजी फक्त ठेकेदाराचं कल्याण व नासिकरांना दंडाचा भुर्दंड , याचाच विचार केलेला दिसतो, यासंदर्भात नागरिकांनी नासिक पोलीस आयुक्त डाँ रविंद्रकुमार सिंघल ज्या पद्धतीने काम करीत आहेत तशीच अपेक्षा शहर वाहतूक शाखेकडून अपेक्षित आहे असे बोलून दाखविले, टोईंग केलेल्या वाहनांसाठी जरूर जागा उपलब्ध करावी पण त्याचबरोबर पार्कींग झोन ही तयार करावेत अशी माफक अपेक्षा व्यक्त होत आहे, मनपा व शहर वाहतूक यांनी पार्कींग झोन बाबत एकत्रित निर्णय घेऊन नासिकरांना पोलीस आयुक्तांप्रमाणे सामाजिक पोलींसिंगचा आणखी एक उपक्रम बक्षिस दिल्यास नासिक पोलींसांच्या मानांत आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।