सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन !!! १०० % पटनोंदणी पंधरवाडा राबविणार !!! प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत कार्यशाळेचे नियोजन करण्यात येणार !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा,!!!

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये  प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर १५ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येणार असून याबाबत नियोजन करण्यासाठी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांच्या उपस्थितीत मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.

१५ जून पासून शैक्षणिक वर्षास सुरवात होत आहे. यासाठी  नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये पटनोंदणी व शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात येणार आहे सर्व गटविकास अधिकाऱ्यांना तसेच गट शिक्षण अधिकाऱ्यांना नियोजन देण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी व शिक्षण विभागाच्या विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे अयोजन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ गिते यांनी सर्व शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगून जिल्ह्यात गुणवत्ता विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले. प्रत्येक मुलगा शाळेमध्ये येण्यासाठी १०० टक्के पटनोंदणी करून मोठ्या प्रमाणात प्रवेशोत्सव सोहळा साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी कळवण तालुक्यातील बंधारपाडा केंद्राचे केंद्रप्रमुख देविदास पगार यांनी कुपोषण निर्मुलनासाठी आईच्या मदतीने ५००० शेवग्याच्या बिया संकलित करून त्याचे तालुक्यात वाटप केल्याबद्दल पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

शाळा प्रवेशोत्सव सोहळा व पटनोंदणी पंधरवडा अंतर्गत ११ जूनला गटस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून, गटशिक्षणाधिकारी अथवा प्रशासनाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांची पटनोंदणी पंधरवडा व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम आयोजनाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तालुकास्तरीय सर्व खातेप्रमुख व अधिकारी यांना शाळा वाटप करून संपर्क अधिकाºयांच्या नियुक्त्याही याच दिवशी करण्यात येणार आहेत. १२ जूनला जिल्हास्तरावर संपर्क अधिकाºयांची पटनोंदणी पंधरवड्यात शाळांना भेटी देण्याचे नियोजन भेट पत्राचे वाटप करण्यासोबतच स्थानिक माध्यमातून प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. १५ जूनला शाळा प्रवेश दिंडी, शाळा व्यवस्थापन समितीची बैठक, पालक-शिक्षक समिती बैठक, नवागतांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तके वितरित करणे, मोफत गणवेश खरेदीचा आढावा घेण्यात येणार असून, १५ ते २५ जून या कालावधीत शाळा प्रवेशासाठी पटनोंदणी पंधरवडा कार्यक्रमाचे शिबिर, २५ जूनला गावात शाळाबाह्ण मुलांच्या भेटी घेणे, २५ ते ३० जून या कालावधीत प्रत्यक्ष पालकांच्या भेटी घेऊन मुलांना शाळेत प्रवेशित करून १ जुलैला पटनोंदणी पंधरवड्यात केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती जिल्हास्तरावर सादर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सर्व गटविकास अधिकाºयांना केल्या आहेत. मुलांना शाळेत आणण्यासाठी देणार दवंडी १३ जून रोजी प्रत्येक शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समितीची सभा होणार असून, १३ ते १६ जून या कालावधीत गावपातळीवर दवंडी देऊन मुलांना शाळेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. १४ जूनला सायंकाळी गावस्तरावर ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अंगणवाडी सेविका व मदतनीस, तलाठी, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, सर्व पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी मशाल फेरीचे आयोजन करणे,  याप्रकारच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ वैशाली झनकार यांनी सांगितले.

कार्यशाळेस तालुकास्तरावरील गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय तज्ञ, विशेष सहायक तसेच शिक्षण विभागातीली उप शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी आदि उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!