विकासाचे स्पीडब्रेकर ठरलेल्या शिवसेना-भाजपाला हटविण्याची जबाबदारी लोकांची आहे-भुजबळ !! सरकारने जनतेला मुर्खात काढले- काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील सूर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टी संयुक्त पत्रकार परिषद !
           नासिक::-आज १ एप्रिल , मुर्खात काढण्याचा दिवस की मुर्खात निघण्याचा दिवस !
            शिवसेना भाजपच्या सरकारने सर्वसामान्य जनतेला मुर्खात काढले हे सांगण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस भवनात संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, या आयोजनासाठी १ एप्रिलचीच निवड केली, प्रश्न असा निर्माण होतो की हा सर्व खटाटोप करून पत्रकारांनाच एप्रिल फुल करून त्यांच्या लेखणीतून तीर मारून घेण्याचा मानस होता की काय ?
           समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले ते त्यापद्धतीने त्यांच्या सोबत असलेले दोन्ही काँग्रेसचे शहाराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनीही सक्षमपणे सहभाग नोंदवित मांडणे अपेक्षित होते. जयंत जाधवांनी प्रास्ताविकाच्या माध्यमांतून काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसच्या माजी मंत्री शोभाताई बच्छाव यांनी बळजबरीने ओढून ताणून समीर भुजबळांनी मांडलेल्या मुद्द्यांनाच पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केला.
         खरोखर जर १ एप्रिलनिमित्त पत्रकार परिषद आयोजित केली होती तर तशीच भारदस्त व्हायला हवी होती. केलेल्या आरोपांचे विरोधकांना खंडन करणे अवघड होऊ देणे हा प्रमुख भागच नष्ट झालेला दिसला. दोन्ही काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती कदाचित इतर जबाबदारी सोपविलेली असल्याने होऊ शकली नसावी.
           आजचा समीर भुजबळ यांचा ईगतपुरी तालुक्यातील दौरा व दौऱ्यातील भेटीगाठी तसेच मतदारांशी झालेल्या संवादाला मिळालेला प्रतिसाद आजघडीला उत्तम ठरावा त्याउलट झालेली पत्रकार परिषद ! मतदारांसोबतचा संवाद नंतर मतदानातून दिसेल किंवा नाही हा भाग नंतर दिसेल, त्याचे मोजमाप आत्ताच मांडणे कुणालाही शक्य नाही, फाँर्म भरणे , माघारी घेणे व तद्नंतर होणाऱ्या सभांमधून काही अंशी अंदाज बांधता येतो,
         आजच्या पत्रकार परिषदेचा सूर फक्त शिवसेना-भाजप सरकारने जनतेला कसे मुर्ख बनविले हा होता, गेली साडेचार वर्ष एकत्र नांदतांना सजग सासू-सुनेसारखं भांडतांना उध्दव ठाकरेंनी कमळाच्या पाकळ्या पाकळ्या वेगळ्या केल्या तर मुख्यमंत्र्यांनी वाघाच्या जबड्यांत हात घालण्याची भाषा केली. दोन्ही पक्षांनी केवळ देखावा ऊभा करून जनतेला मुर्ख बनविले. वर्षभर एप्रिल फूल केले, नासिकमध्ये शिवसेनेचे खासदार व भाजप, शिवसेनेच्या आमदारांनीही या खेळात सहभाग घेतला अाहे असे सांगीतले.
             प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा जमा करण्याचे पंतप्रधान मोदींनी तर मुख्यमंत्रांनी नासिक दत्तक घेतल्याचे वचन दिले होते, उध्दव ठाकरेंनी अयोध्येत रामाची पुजा केली पण त्यांना राम मंदीर काही करता आले नाही, "आधी मंदीर मग सरकार" चे काय झाले ? त्यांनी राम भक्तांसह खुद्द रामाचीही फसवणुक केली. देशांत राज्यात या दोन्ही पक्षांनी फसवणुकीचा धंदा जितका तेजीत चालविला तितक्याच तेजीत नासिक शहर व जिल्ह्यातील खासदार आमदारांनी चालविला आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत नासिक प्रगतीपथावर होते मात्र त्यानंतर गेल्या पाच वर्षात कोणतीही नवीन योजना वा प्रकल्प आले नाही, या विकासाचा स्पीडब्रेकर ठरलेले शिवसेना-भाजप यांना हटविण्याची जबाबदारी लोकांची आहे असे समीर भुजबळ यांनी सांगीतले.
         पत्रकार परिषदेत एका पुस्तिकेचे पत्रकारांना वाटप करण्यात आले, तीच पुस्तिका लोकांपर्यंत पोहचविली जाणार असुन जनतेच्या मनांतील प्रश्न शिवसेना-भाजपला विचारण्यात आले आहेत .

Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!