खा. युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत, म्हाळसामाता पुण्यतिथी निमित्त जपानुष्ठाण व ध्वजारोहन सोहळा तसेच रक्षाबंधनानिमित्त महीलांना वस्रभेट कार्यक्रम ! ॐ जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज आश्रम ओझर (मिंग) येथे २२ आॅगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमाला राज्याचे दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री ना. अर्जुन खोतकर प्रमुख पाहुणे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

म्हाळसामाता पुण्यतिथी व रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन !
या कार्यक्रमाला महीलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन छावा क्रांतीवीर सेना नासिकच्या वतीने करण्यात आले आहे !
           नासिक(२१)::-दि. २२ ऑगस्ट रोजी ॐ जगतगुरु जनार्दन स्वामी (मौनगिररीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी परमपूज्य स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व ओझर येथील पावन सानिध्यात, मातोश्री म्हाळसामाता पुण्यतिथी व रक्षाबंधना निमित्ताने महिलांना वस्रभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,  या कार्यक्रमसाठी खा. युवराज छत्रपती संभाजीराजे यांची प्रमुख उपस्थिती असून, दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री ना. अर्जुन खोतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिली.
        या प्रसंगी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना खा. स़भाजीराजे यांनी कठीण समयी मानसिक, सामाजिक व स्वता पूरस्थिती वर नजर ठेवून सर्वसमावेशक निर्णय घेतल्याचा व जनतेला धीर देण्याचे कार्य करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित केले त्याचे मुल्यमापन करणे अशक्य आहे मात्र अशा रयतेच्या राजाचा सत्कार तर व्हायलाच हवा या भावनेने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
        छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत पाठविणे सुरू असताना करण गायकर यांनी केलेल्या पाहणीत नागरीकांना कसली गरज आहे हे जाणून घेतलं त्यानुसार उद्या पुन्हा पूरग्रस्तांना वस्तूरुपाने मदत व धनादेश देण्यात येणार असल्याची माहिती छावाचे युवा प्रदेश अध्यक्ष शिवा तेलंग यांनी दिली.
              सकाळी दहा वाजता ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे अशांनी हाॅटेल एक्स्प्रेस  इन येथे जमावे व ज्यांच्याकडे चारचाकी वाहन नाही त्यांनी दुपारी २ वाजता जनशांतीधाम ॐ जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज आश्रम ओझर (मिंग) येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन छावा चे आयटी प्रदेश अध्यक्ष किरण बोरसे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!