१) वैद्यकीय अधिकारी लाचलुचपत च्या जाळ्यात !! २) शाखा अभियंता निलंबित !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव पोर्टल www.newsmasala.in

१) वैद्यकीय अधिकारी लाचलुचपत च्या जाळ्यात !
************************
२) शाखा अभियंता निलंबित !
       नासिक::- उप जिल्हा रुग्णालय मनमाड येथील वैद्यकीय अधिकारी व कक्ष सहाय्यक यांना आज लाचलुचपत विभागाने  लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.
         तक्रादाराच्या बहिणीचे सिझेरीन करण्यात आले होते त्याबदल्यात ४०००/- रुपये लाच मागितली होती, तडजोडीअंती रुपये ३०००/-  स्विकारतांना उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील सुभाषराव पोतदार व उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथील कक्ष सहाय्यक प्रविण निलकंठ राठोड या दोन्हीना पंच साक्षीदारांसमक्ष रुपये ३०००/- लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नासिक यांनी रंगेहाथ पकडले.
*****************************************
    शाखा अभियंता इंगळे निलंबित
            नासिक::- गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर बोरपाडा रस्त्याच्या कामाचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आला होता त्यानुसार आज जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग शाखा अभियंता इंगळे यांना निलंबित करण्यात आले.
        एकच रस्ता जो सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला होता त्याच रस्त्याचे काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केल्याचे दाखवून बील काढल्याचे चौकशी समिती ने केलेल्या पाहणी अहवालातून प्रथमदर्शनी दिसून आल्याने शाखा अभियंता इंगळे यांना निलंबित करण्यात आले.
पुढील कार्यवाही आज उशिरापर्यंत सुरू होती.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ! ८ जानेवारीला देशव्यापी संप !! अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!