कवी प्रशांत धिवंदे यांची विठ्ठल वारी रचना !


कवी प्रशांत धिवंदे यांची विठ्ठल वारी रचना !


आषाढी एकादशी

आज एकादशी । आषाढ मासाची ।।
आस दर्शनाची । लागे मनी  ।। १।।

घेऊन पालख्या । आले वारकरी ।।
मुखी नाम हरी। जपताती  ।।२।।

माता-भगिनींच्या । डोईला तुळस ।।
चालण्या आळस । नसे कोणा  ।।३।।   

वाजविती टाळ । मुखाने गजर ।।
भक्तीचा हा ज्वर । चढलासे  ।।४।।  

भक्तीमध्ये तुझ्या । वारकरी दंग ।।
गाताती अभंग । मनोभावे  ।।५।।

वारीत साऱ्यांची । जोडलिया नाळ ।।
करिसी सांभाळ । विठू तूची  ।।६।।

दर्शनासी तुझ्या । चंद्रभागा काठी ।।                
झाली बघ दाटी । पांडुरंगा  ।।७।।

मना खुणावते । रूप मनोहरी ।।
फळा येई वारी । दर्शनाने  ।। ८ ।।

रचना - प्रशांत र. धिवंदे
देवळाली कॅम्प, नाशिक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !