न्यूज मसालाच्या लोकराजा दिवाळी विशेषांकाला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ! दिवाळी विशेषांक प्रकाशक अनेक संकटांचा सामना करीत लेखक कवी यांच्या सृजनशील शब्दांना समाजापर्यंत पोहचवितात - अॅड. बाळासाहेब तोरस्कर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

लोकराजा दिवाळी विशेषांकाला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान !
    पुणे (२२)::- न्यूज मसालाच्या लोकराजा दिवाळी विशेषांकाला नक्षत्रांचं देणं काव्यमंच, पुणे, या संस्थेकडून मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे जेष्ठ लेखक, समिक्षक अॅड बाळासाहेब तोरस्कर प्रसिद्ध कवी विलास शिंदे, यशस्वी उद्योजक अतुलशेठ परदेशी, वसई येथील सुप्रसिध्द डॉ, पल्लवी बनसोडे, रेखा रोशनी मुंबई, संस्थेचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे आदिंच्या उपस्थितीत अंकुशराव लांडगे सभागृहात येथे सोहळा संपन्न झाला.
        पुणे येथील नक्षत्राचं देणं काव्यमंच ही संस्था गेली वीस वर्षे लेखक कवी यांना एक वैचारिक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. लेखक कवी यांना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी दिवाळी अंक प्रकाशक मोठ्या कष्टाने व आर्थिक संकटातून प्रयत्नशील असतात त्यांचा सत्कार करणे व त्यांना सामाजिक पाठबळ मिळावे या हेतूने तेरा वर्षांपासून राज्यभरातील दिवाळी विशेषांकातून दरवर्षी तीन उत्कृष्ट अंकांना  गौरविण्यात येत आहे, या वर्षी न्यूज मसालाच्या लोकराजा दिवाळी विशेषांकाला गौरविण्यात आले.
          राज्यातील अनेक ठिकाणांहून आलेल्या कवी, पत्रकार, यांच्या कवितांचे वाचन केले गेले, संपूर्ण दिवसभरात अनेकांनी कवितांच्या पावसात रसिकांना भिजविले, मंत्रमुग्ध करणाऱ्या कवितांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नक्षत्राचं देणं काव्यमंच चे संस्थापक अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.


टिप्पण्या

  1. अभिनंदन लोकराजाचे लोकप्रिय संपादक

    उत्तर द्याहटवा
  2. लेखक कवी आणि संपादकीय मंडळ यांचे हार्दिक अभिनंदन

    उत्तर द्याहटवा
  3. लेखक कवी आणि संपादकीय मंडळ यांचे हार्दिक अभिनंदन

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!