मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर कामगारांचे उपोषण मागे ! कामगारांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे संबंधित यंत्रणांना आदेश !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

मुंबई दि. १९ : माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाशी संबंधित असलेल्या विविध प्रश्नांची तातडीने सोडवणुक करण्याच्या व त्याबाबतच्या अधिसुचना त्वरीत काढण्याच्या सुचना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने ‘‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन’’ चे पदाधिकारी वकार्यकर्त्यांचे सोमवार दि. १८ जून २०१८ पासून आझाद मैदान, मुंबई येथे सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले.

            माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात संयुक्त बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत हे आदेश दिलेले आहेत.बैठकीस महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील, कामगार मंत्री ना. संभाजी पाटील-निलंगेकर,कामगार विभागाचे प्रधान सचिव बलदेव सिंह, महसुल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सहपोलिस आयुक्त देवेन भारती, कामगार आयुक्त नरेंद्र पोयाम, सह कामगार आयुक्त (माथाडी), श्री लाखस्वार, सहाय्यक कामगार आयुक्तश्री.वि.रा.जाधव, विविध माथाडी बोर्डाचे अधिकारी, माथाडी कामगार नेते आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप,आमदार शशिकांत शिंदे, सेक्रेटरी व पीआरओ श्री. पोपटराव देशमुख आणि नऊ कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

            माथाडी सल्लागार समितीवर युनियनच्या तीन प्रतिनिधीची नेमणूक करून जीआर काढणे, माथाडी बोर्डाच्या पुनर्रचना करून युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका करण्याची प्रक्रिया तातडीने पुर्ण करून पुनर्रचित केलेल्या ग्रोसरी बोर्डावर युनियनच्या तीन प्रतिनिधींची सदस्य म्हणून  नेमणुका केल्याचा जीआर काढणे, महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळाचे एकच माथाडी मंडळ करण्याचा निर्णय पूर्णपणे रद्द करून आवश्यक त्याच उपाययोजना करण्याच्या,  माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांनाच १०० %प्राधान्य देण्याचे, माथाडी बोर्डावर पूर्णवेळ चेअरमन व सेक्रेटरी नेमण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. वडाळा व चेंबूर येथील जमिनीवर माथाडी कामगारांची घरकुल योजना तातडीने होण्यासाठी सुनावणी घेऊन कायदेशीर बाबी पूर्ण करण्याच्या आणि जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई तातडीने करण्याचे मान्य करण्यात आले व तशी कार्यवाही तातडीने करण्याच्या सुचना करण्यात आल्या. माथाडीकामगारांच्या हक्काच्या कामात अडथळे आणून बेकायदेशीर कामेकरणाऱ्यांवर पोलिस यंत्रणेकडून कडक कारवाई करण्याचे व खऱ्यामाथाडी कामगारांना हक्काचे काम करण्यास संरक्षण देण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी पोलिस यंत्रणेला दिल्या,नाशिक, कोल्हापूर, लातूर, पुणे व कळंबोली येथील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र सरकारशी संबंधित असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी माथाडी कामगार युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे उपोषण आंदोलन सोमवार दि. १८ जून २०१८ पासून आझाद मैदान,मुंबई येथे आयोजित केले होते. या उपोषण आंदोलनात माथाडी कामगार नेते आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून ६० ते ७० सदस्यांनी उपोषणात भाग घेतला होता. मा.मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दि. १८ जुन रोजीच वर्षा निवासस्थानी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला पाचारण केले होते. दि. १९ जून रोजी मंत्रालयात संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार मुख्यमंत्री यांनी बैठक आयोजित केली व माथाडी कामगारांच्या न्याय प्रश्नांची सोडवणूक करण्याचे निर्णय घेतले त्याबद्दल मुख्यमंत्री व शासनाचे माथाडी कामगार नेत्यांनी आभार व्यक्त केले आहे.
                        07387333801

Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!