युट्युबवर HARMONISA शब्द टाका आणी म्युझिक बँडचे अफलातून गाणं समोर !! जागतिक संगीत दिनाची आठ शिष्यांकडून पं.सुरेश वाडकरांना विशेष भेट !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

पं. सुरेश वाडकरांच्या आठ शिष्यांची गुरूंना
जागतिक संगीत दिनानिमित्त विशेष भेट !

'हरिभाऊ विश्वनाथ कंपनी’च्या उदय दिवाणे यांच्या सहकार्यातून Harmoनिसां"  म्युझिक बँडचं *'Melody Melange' गाणे साकार!

"Harmoनिसां" म्युझिक बँडचं 'Melody Melange'  हे गाणं नुकतंच जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधून YouTube वर प्रसारित करण्यात आलं आहे. प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते प्रकाशित झालेली ही काहीशी हटके असलेली संगीतकृती अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवत आहे.

राग *किरवाणी* वर आधारित तीन भिन्न प्रकृतीच्या गीतांचा हा समन्वय आहे. 'मुकुटवारो सांवरो' ही शास्त्रीय बंदिश, 'ओ माय लव्ह' हे पाश्चात्य धाटणीचं नवीन इंग्रजी गीत आणि 'दिल की तपिश' हे कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील सिनेगीत असा त्रिवेणी संगम आपल्याला यात ऐकायला मिळतो. कधी सरगम, तर कधी वेस्टर्न म्युझिकचे पीसेस वापरून ही गाणी कौशल्यपूर्ण रीतीने जोडली गेल्याने त्यांचा एकसंध अनुभव मिळतो.

आल्हाददायक निसर्गाच्या सान्निध्यात रोहिता मोरे आणि प्रथमेश रांगोळे यांनी चित्रीकरण केलेला व्हिडीओ या गाण्याच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतो.

हार्मोनिसा बँडमध्ये शुभम वखारे, गौरव महाराष्ट्राचा फेम सौरभ वखारे, सूर नवा ध्यास नवा फेम पद्मनाभ गायकवाड,अनामिका शर्मा, स्नेहा हेगडे, द व्हॉइस फेम कृतिका बोरकर, अनुराग पुराणिक, रुद्रेश कानविंदे असे लोकप्रिय आणि प्रतिभाशाली युवा गायक कलाकार एकत्र आले असल्याने या बँडकडून रसिकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. यांपैकी कुणी संगीत दिग्दर्शनात प्रवीण आहे, कुणी भारतीय शास्त्रीय गायकीत, तर कुणी वेस्टर्न मध्ये निपुण आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ढंगांची गाणी नवीन बाजात या बँडकडून सादर केली जातील अशी अपेक्षा आहे.

'ओ माय लव्ह' हे या व्हिडिओ मधील गाणं स्वप्निल चाफेकर यांनी लिहिलं असून शुभम-सौरभ यांनी संगीतबद्ध केलं आहे.सिनेविश्वातील प्रतिभावंत आणि प्रसिद्ध संगीत संयोजक आलाप देसाई यांनी या गाण्यांची अरेंजमेंट केल्याने संपूर्ण गाणं कमालीचं श्रवणीय झालं आहे. मनीष मदनकर यांचा तबला आणि मानस कुमार यांचं व्हायोलिन त्यात अजून रंग भरतात. हे संपूर्ण गाणं आजीवासन स्टुडिओचे आणि फिल्म इंडस्ट्री मध्ये सुप्रसिद्ध असलेले रेकॉर्डिस्ट अवधूतजी वाडकर यांनी रेकॉर्ड केलं असून परदेशात युनायटेड किंगडम (लंडन)मधील गेथिन जॉन यांनी त्याचं अप्रतिम मास्टरिंग केलं आहे.

संगीत वाद्यांचे विक्रेते, सुप्रसिद्ध हरिभाऊ विश्वनाथ कं. चे उदय दिवाणे हे प्रस्तुत गाण्याचे निर्माते असून नेहमीप्रमाणे ते कुशल उदयोन्मुख युवा पिढीला या रूपाने प्रोत्साहित करत आहेत.

एक नवा अनुभव घेण्यासाठी हे गाणं रसिकांनी आवर्जून पहावं. युट्यूबवर Harmonisa शब्द टाकल्यास हे गाणं चटकन समोर येईल.प्रसिद्ध गायक श्री.सुरेश वाडकर, पद्मा वाडकर, प्रसिध्द संगीतकार आशीत देसाई, संपदा स्वप्निल बांदोडकर, तसेच संगीतकार निलेश मोहरीर अशा संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी या गाण्याचं कौतुक केलं आहे.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ! ८ जानेवारीला देशव्यापी संप !! अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!