महाराष्ट्रातील पूर परिस्थितीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा-अण्णासाहेब कटारे! ईव्हिएम हटाव मोर्चात होणार सहभागी !! पत्रकार परिषदेच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

महाराष्ट्रातील पुर परिस्थितीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा-अण्णासाहेब कटारे!
शुक्रवार दि.१६ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी मुंबई येथील मराठी पत्रकार भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला धरले धारेवर!
मुंबई(प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले की संपूर्ण महाराष्ट्र अगोदरच दुष्काळाने होरपळत होता. पर्जन्यमान समाधानकारक होईल असे वेधशाळेचे अंदाज होते, सुरुवातीपासूनच पाऊस बऱ्यापैकी झालाही परंतु मागील १० ते १५ दिवसांचा पाऊस हा तर भयंकर उग्र स्वरूप घेऊन आला, ह्या अतिपावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्हे बाधित झाले परंतु सांगली, सातारा, कोल्हापूरला मात्र याचा सर्वाधिक फटका बसला व अनेक लोकांचे प्राण गेले, जनावरे दगावली, घरे-दारे, शेती वाहून गेली, भयंकर परिस्थिती निर्माण झाली. सुरुवातीपासून ह्या सरकारने पूरपरिस्थिती कडे कानाडोळा करून आपली महाजनादेश यात्रा सुरू ठेवली, पूरग्रस्त मदतीची याचना करीत असतांना सरकारने त्वरित कुठलीही उपाय योजना केली नाही. यात नियोजनाचा अभाव प्रकर्षाने जाणवला, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे पूरग्रस्तांना मदत पाठवीत आहे.सरकार ने मदत पाठवितांना डाळ, साखर, तांदूळ, गहू यावर मात्र मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र लावण्यास मात्र ते विसरले नाही, हे संवेदनाहीन सरकार आहे अशीच चर्चा आता सुरू आहे.
     ईव्हिएम मशीन हटाव !
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ईव्हिएम मशीनचे घोटाळे जनतेसमोर आले आहे.प्रत्यक्ष झालेले मतदान व मोजणीचे वेळी झालेली तफावत याबाबत निवडणूक आयोग देखील समाधान करू शकले नाही. लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर ईव्हिएम मशीन हटलेच पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे. मुंबईत सर्व विरोधी पक्षांच्या वतीने ईव्हिएम मशीन हटाव मोर्चा निघणार आहे,मोर्चात देखील आम्ही ताकदीने सहभाग नोंदविणार आहोत.
          यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी आघाडी सरकारवर चांगलेच ताशेरे ओढत पुरग्रस्तांच्या मदतीला धावून न जाणाऱ्या या षंढ सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला, यावेळी विधानसभा निवडणूका बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत अन्यथा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष पूर्ण राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल अशीही सरकारला चेतावणी देत होणाऱ्या नुकसानीला सत्ताधारी सरकार जबाबदार असेल असेही त्यांनी या पत्रकार परिषदेत पत्रकारांना उत्तरे देत सरकारला सूचित केले, या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देते वेळेस राष्ट्रीय प्रवक्ते गिरीश अकोलकर यांनीही या नाकाम सरकरवर जोरदार टीका करत निषेध व्यक्त केला तसेच मुंबई प्रदेश अध्यक्ष अशोकराव भोगले यांनीही यावेळेस सरकारला इशारा देत ठणकावून सांगितले की, येणाऱ्या विधानसभा निवडणुका या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत अन्यथा याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा यावेळी पत्रकारांच्या माध्यमातून सरकारला दिला. या पत्रकार परिषदेस राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष युवा नेते बीपीन कटारे, मुंबई प्रदेश महासचिव, सचिनभाऊ नांगरे पाटील, आदींसह प्रमुख पदाधिकारी उपास्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!