आयपीएल कंपनीचे वितरण व्यवस्थापक सचिन काकुस्ते व वितरण अधिकारी अनंत देवरे यांच्या कडून कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

         आयपीएल कंपनीचे वितरण व्यवस्थापक सचिन काकुस्ते व वितरण अधिकारी अनंत देवरे यांच्या कडून कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन !      
            
                    टेंबे ता.शिरपूर::-सर्वच शेतकऱ्यांना शासनस्तरावरून प्रशिक्षण घेणे शक्य होईलच असे सांगता येत नाही मात्र अतिपावसामुळे जर कपाशीचे नुकसान झाल्यास प्रशासनावर खापर फोडायला सुरुवात होते, शासनस्तरावर शेतीशिवारांना भेटी न देणे, वेळच्या वेळी मार्गदर्शन न करणे, शासन व शेतकर्‍यांमध्ये समन्वयकांची भुमिका न घेणे असे आरोप परिसरातील शेतकरी कृषी विभागांवर करित असतात. यात तथ्य असेलच असे नाही, मात्र आजही शेतकऱ्यांमध्ये जागृती अभियान सतत राबविण्यात यायला हवे. याचा काही शेतीपूरक औषध निर्मात्या कंपन्यांकडून  प्रबोधन कार्यक्रम आयोजित केले जातात. असाच काहीसा कार्यक्रम टेंबे ता. शिरपूर जि. धुळे येथे. आयपीएल      कंपनीचे वितरण व्यवस्थापक सचिन काकुस्ते व वितरण अधिकारी अनंत देवरे यांनी राबविला. सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अती पावसामुळे कपाशी पिकावर येऊ शकणारा रोग व त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
            मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, शेतात साचून राहिलेल्या अतिपावसाच्या पाण्यामुळे कपाशी पिकाला बुरशीजन्य रोगाची लागण झाल्यास असून शेतकरी वर्ग हवालदिल बनतो. या रोगाच्या प्रार्दुभावाने कपाशी पिक धोक्यात येऊ शकते यामुळे शेतकर्‍यांना लाखोंचा फटका बसण्याची शक्यता निर्माण होते. कपाशी हे नगदी पिक असून पांढर सोने म्हणून ओळखल जाते. शेतीशिवारामध्ये पाणी साचून राहिल्याने पाण्याचा योग्य व्हावा तसा निचरा न झाल्याने कपाशीच्या मुळाशी बुरशीजन्य रोगाची लागण होते. अतिउष्णतेमुळे जमिनीतील शांत न झालेली ऊब व अतिपाण्यामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने बुरशीजन्य या रोगाची लागण होते व कपाशीचे झाडांची  मुळे अतिपाण्याने सडायला सुरूवात होवून तो रोग संसर्गाप्रमाणे इतर मुळांकडे जावून दुसर्‍या झाडाचे मुळही खराब करते.  टवटवीत झाडे ही कोमजून जाते, ऐन फुल-फळावर कपाशी पिक आले असता या बुरशीजन्य रोगाने झाडांना मर लागते व शेतातूून कपाशीचे झाडे उपटून फेकण्याशिवाय शेतकर्‍यांकडे पर्याय नसतो. कपाशीवर हा बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यामुळे पाने व फुलफळे गळु लागतात. मे मध्ये लागवड केलेल्या कपाशीचे कैर्‍या जुलै आॅगस्ट दरम्यान जास्त प्रमाणात आलेल्या पावसामुळे नुकसानकारक ठरू शकतात.
           पांढरी माशी व तीच्याबद्दल माहिती देताना सांगितले की, पांढरी माशी  कापसाच्या कोवळ्या पानावर खालच्या बाजूने अंडी घालते.  अंडी घालताना मादी मेणासारखा पांढरा पदार्थ पानावर सोडते. त्यामुळे अंडी पानावर चिकटतात. जास्त अंडी घातली असल्यास पाने खालच्या बाजूने पांढरट दिसतात. प्रत्येक मादी जास्तीत जास्त १२० ते सरासरी २८ ते ४३ अंडी घालते. पांढर्‍या माशीचा जीवनक्रम पुर्ण होण्यास हवामानानुसार १४ ते १०७ दिवस लागतात. वर्षभर प्रजनन होत असल्याने सर्व अवस्थेतील कीड कापूस पिकावर आढळते. वर्षभरात १० ते १२ पिढ्या तयार होतात. तीचा प्रादुर्भाव  मे -जून महिन्यात पेरलेल्या नवीन कापसाचे पिकावर होतो. जून ते ऑगस्ट महिन्यात किडीचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाळ्यात प्रादुर्भाव कमी होतो. मात्र पाऊस थांबल्यावर पुन्हा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो व पानांच्या प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा येतो. ही माशी पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पानांवर पांढरे डाग पडून पान जळल्यासारखे दिसते. नंतर गळून पडते. पांढरी माशी रस शोषून घेतल्यानंतर विष्टेद्वारे गोड पदार्थ शरीराबाहेर टाकते. यावर काळी बुरशी वाढते. संपुर्ण पान काळे पडते. या बुरशीलाच 'कोळशी' म्हणतात. यामुळे बोंडे, पाती गळतात किंवा गोंड पुर्ण उमलले जात नाही. यावेळी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी व कोणत्या प्रकारची औषधे वापरावी यांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास टेंबे गावातील कापूस उत्पादक शेतकरी हजर होते.


Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ! ८ जानेवारीला देशव्यापी संप !! अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाम. छगन भुजबळ यांना देण्यात आले निवेदन ! मुख्यमंत्री यांनी आपला विशेषाधिकार वापरून तत्काळ झालेला निर्णय मागे घ्यावा !! अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा !!! कुणी दिले निवेदन, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!