राजलक्ष्मी अर्बन को. आॅप. बॅंक लि. नासिक ची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात बॅंकेचे अध्यक्ष आम. डॉ. राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ! आमदार डॉ राहुल आहेर यांनी वाढदिवस साजरा न करता होणा-या सर्व खर्चाची रक्कम कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून दिली !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल www.newsmasala.in.

नासिक (दि.२४)::- राजलक्ष्मी अर्बन को.आॅप. बॅंक लि.नासिक ची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात बॅंकेचे अध्यक्ष आम. डॉ. राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
              २२ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या मागील सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तास कायम करून ३१ मार्च २०१९ अखेर संपलेल्या आर्थिक अहवालास मंजूरी देण्यात आली. नफा वाटणीस व लाभांश वाटप, मागीलवर्षी झालेला जादा खर्च व पुढील खर्चाचे अंदाजपत्रक, तसेच एकरकमी परतफेड करणे योजना स्विकारलेल्या व त्याअंतर्गत बंद झालेल्या थकीत कर्ज खात्यांची माहिती ची नोंद घेऊन मंजूरी देण्यात आली, आयत्या वेळी आलेल्या विषयांवर   चर्चा करण्यात आली.
           सभा सुरू होण्यापूर्वी आजच भारताचे माजी अर्थमंत्री अरुण जेटलींचे निधन व मागील वर्षभरात बॅंकेशी निगडित, हितचिंतक, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, ज्ञात-अज्ञात व्यक्तिंचे निधन व सीमेवरील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून सभेच्या कामकाजास सुरूवात करण्यात आली.
           बॅंकेचे अध्यक्ष आम. डॉ. राहुल आहेर यांचा १६ आॅगस्ट रोजी असलेला वाढदिवस साजरा न करता होणाऱ्या सर्व खर्चाची रक्कम कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात आली याचा सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले व सभासदांनी सर्वानुमते डाॅ. आहेरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
          बॅंकेने सभासद व खातेदारांसाठी यापूर्वीच कोअर बँकिंग, लाॅकर्स, फ्रॅंकींग सुविधा, तसेच आयडीबीआय, अॅक्सिस,यस बॅंक, एचडीएफसी बॅंक यांचेशी करार करून आरटीजीएस, एनईएफटी, टॅक्स कलेक्शन, सीटीएस क्लिअरींग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, सोबतच एसएमएस, मिसकाॅल, एटीएम कार्ड सुविधा सुरू केली आहे, खातेदारांना प्रधानमंत्री योजनेअंतर्गत सुरक्षा विमा योजना, व जीवनज्योती विमा योजना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत अशी माहिती अध्यक्ष आम. डॉ. राहुल आहेर यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
             सभेस उपाध्यक्ष जगन पाटील, कार्यकारी संचालक नंदलाल काळे, संचालक बाळासाहेब मगर, अॅड. परमानंद गुजराथी, अर्जुन कठपाल, अॅड. काशीनाथ घुगे, बाळासाहेब पाटील, प्रा. कुणाल वाघ, सौ. सुरेखा भामरे, दिनेश देवरे, सौ. शोभनाताई आहेर, अॅड. बाळासाहेब पगार, डॉ. ज्ञानेश्वर थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी मृणालिनी पाटील, सभासद बाळासाहेब आहेर, महेश भामरे, नरेंद्र पाटील, नाना पवार, अनिता भामरे, शाम धोंडगे, शिवाजी सोनवणे, आदींसह मोठ्या संख्येने सभासद हजर होते.
     बॅंकेचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब मगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!