अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वकृत्व स्पर्धेचे एसकेडी चॅरिटेबल ट्रस्ट व गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बातमीत दिलेल्या संपर्क नंबरवर नोंदणी करून सहभाग नोंदवावा !! यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार !!! अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव निमित्ताने
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वकृत्व स्पर्धा.
           नाशिक (प्रतिनिधी)::- येथील एस.के.डी. चॉरिटेबल ट्रस्ट व गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्या
संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा संवाद लेखन वाचन आत्मविश्वास कौशल्य विकसित व्हावे या उदात्त
हेतुने एस.के.डी. चॅरिटेबल ट्रस्ट व गिरणा गौरव प्रतिष्ठान च्या वतीने जिल्हातील महाविद्यालयांतील विदयार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धा २१ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत, कर्मवीर शांताराम बापू वावरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिडको, नासिक मध्ये वकृत्व स्पर्धेचे आयोजन केलेची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संजय देवरे व गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली. सदर स्पर्धेचे विषय,
मोबाईलमुळे वाचन व संवाद हरवला आहे ?, शिक्षणाचं खरंच बाजारीकरण झाले का?, शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागतील का? ,  शिक्षणातुन समाज परिवर्तन !
आदी चार विषयांवर स्पर्धा घेण्यात येणार आहे . प्रथम, द्वितीय, तृतिय, तसेच उत्तेजनार्थ विशेष बक्षीस व रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे, तरी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन एस.के.डी. चॉरिटेबल ट्रस्ट व गिरणा गौरव प्रतिष्ठान कडून करण्यात आले आहे.
भावी पिढीमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, संवाद, वाचन, कला, कौशल्य विकसित होण्यासाठी, सद्विचारांच्या हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजन आहे.
पारितोषीके
प्रथमः क.५000/- रोख
स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र
द्वित्तीय : रु.३५००/- रोख
स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र
तृतिय: रु.२५००/- रोख
स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र
उत्तेजनार्थ: १५००/-
स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र
स्पर्धा दिनांक: २१/९/२०१९
स्पर्धेचे ठिकाण : कर्मवीर शांताराम बापू वावरे.
कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सिडको (नाशिक)
नाव नोंदणीसाठी संपर्क : ०२५३-२३१८४८४
९४२३५५६७२८
__________________________________________
एक पुस्तक, एक पेन, एक दिद्यार्थी, एक शिक्षक आणि सुंदर संवद हे संपुर्ण जग बदलु शकतात, त्यासाठी घडावा लागतो सुसंवाद.
__________________________________________

Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!