घरकुलाचा हप्ता मिळण्यासाठी स्विकारली लाच !ग्रामसेवकासह रोजगार सेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

घरकुलाचा हप्ता मिळण्यासाठी स्विकारली लाच ! ग्रामसेवकासह रोजगार सेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! नासिक (जळगाव)::- तक्रारदाराकडून २३/०६/२०२५ रोजी आलेल्या तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता मंजूर असलेल्या घरकुलाचा दुसऱ्या हप्ता मिळावा व गट नंबर नमुना आठ मिळावा यासाठी सहा हजाराची मागणी केली आहे. रोजी तक्रारदार यांच्याकडून मांडकी आणि अंतुरली बुद्रुक तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथील लोकसेवक ग्रामसेवक सोनिराम धनराज शिरसाठ व मांडकी ता. भडगाव जि. जळगाव येथील रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. ६०००/- रुपयांची मागणी करून तडजोड अंती ५०००/- रुपये पंचा समक्ष ५०००/-रुपये स्वीकारताना रंगेहात मिळून आले आहेत. यातील तक्रारदार यांच्या मंजूर असलेल्या घरकुलाच्या दुसरा हप्ता मिळावा व गट नंबर नमुना आठ मिळावा यासाठी सहा हजाराची मागणी केलेली होती व आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून सहा हजार रुपयांची लाचेची मागणी करीत असल्याब...