कुत्रा आणि पत्रकारात फरक काय ? सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश मे. जोसेफ कुरीयन यांनी वाॅचडाॅग शब्दप्रयोग कुणासाठी वापरला ? सविस्तर माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


             यशस्वी चोरी करायची (वैयक्तिक फायद्यासाठी किंवा समाजाच्या भल्यासाठी) असेल तर,
बंगल्याच्या आवारात कितीही कुत्रे असूद्या, सदर चोरावर एकही कुत्रा भुंकू शकत नाही, कारण त्या चोराकडे बुद्धी असते, तो छोट्या चोऱ्या करतच नाही, मोठ्याच करतो, व मोठ्यांकडेच कुत्रे असतात ! तो चोर समाजहितासाठी चोरी करत असेल तर तोच या जगात *शोध पत्रकारिता* करणारा पत्रकार म्हणून गणला जातो, या यशस्वीतेसाठीचा फंडा शेवटी आपणांस सांगणारच आहे, तत्पूर्वी पत्रकारांना कुत्रा संबोधले आहे असे पत्रकारांनी समजू नये, मात्र कुत्रा किंवा श्र्वान हे वासावरून गुन्हेगारांचा शोध घेतं, तसेच एखाद्या छोट्या संकेतांने पत्रकार बातमी करतो, त्याला "वास" आला रे आला, समजून घ्या समोरच्याची चड्डी पिवळी झालीच, मग कुत्रे अंगावर सोडलीच !  जो वासावरून खरी बातमी पत्रकारांना पोहचवितो तो कुत्रा व संकेतावरुन समाजापर्यंत बातमी पोहचवितो तो पत्रकार !
मग कुत्रा आणि पत्रकारात काय फरक, म्हणून राग मानू नका,
सर्वोच्च न्यायालयाचे २०१८ चे तत्कालीन न्यायाधीश जोसेफ कुरीयन यांनी "वाॅचडाॅग" हा शब्दप्रयोग केला होता की न्यायव्यवस्था व माध्यमे (पत्रकार) सुदृढ लोकशाहीतील "वाॅचडाॅग" आहेत, त्यांनी भुंकायलाच हवे.
म्हणून कुत्रा आणि पत्रकारात फरक काय ?
फक्त अंगावर धावून येतात ते कुत्रे वेगळे असतात त्यांचा या विषयाशी कोणताही संबंध नाही, ते गल्ली छाप कुत्रे असतात,
आता या गल्ली छाप कुत्र्यांना आवरणे समाजाला अवघड असते मात्र समाजाचा अर्थात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारांना त्यांना आवरणे खूपच सोपं आहे पण त्याचा अभ्यास न केल्याने पत्रकारांवर हल्ला होतो व रेबीज पासूनच्या बचावासाठी पूर्वी चौदा इंजेक्शने बेंबीत घ्यावी लागत ती संख्या आता तीनवर आली आहे, अन् तीही दंडावर घ्यावी लागतात ! तरीही त्रास होत़ोच मग यावरील उपाय,
पत्रकार बांधवांनो,  जा खुशाल बातमीच्या चोरीसाठी, हा आपला समाजाच्या भल्यासाठी असलेला विषय आहे, फक्त या चोरीसाठी जाण्याअगोदर काही काळ कुत्र्यांच्या संपर्कात रहा, त्यांची लाळ थोडीशी तुमच्या गुडग्याखाली लागू द्या, चप्पल, बुटाला लागू द्या मग बघा, भल्याभल्यांची कितीही मोठी कुत्री तुमच्या अंगावर येऊ देत, तुम्ही तुमचा धीर काही काळ जाऊ देऊ नका, येऊ द्या कुत्र्यांना तुमच्याजवळ, दोन फुटांवर येऊन तुमच्यासमोर ते किंवा ती सर्व कुत्री शेपटी हलवत राहतील, भुंकायचा विषयच नाही, मग खुशाल तुम्ही कशीही चोरी करा, पोलिस दप्तरी त्या चोरीला *धाडसी* चोरी म्हणून नोंद होईल ! इतके भयंकर कुत्रे असताना चोरी झालीच कशी यांचे उत्तर द्यायला म्हणजेच ( *पत्रकार संरक्षण कायदा* ) कुण्या ज्योतिषाची गरजच लागणार नाही !
कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा, पण पत्रकारांवर हल्ला हे खचितच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला भूषणावह नाही याची सर्व राजकारण्यांनी व प्रशासनाने दखल घेण्यासारखा विषय आहे, तो प्रलंबित वा ताटकळत ठेवणे भविष्यकाळासाठी धोकादायक ठरू शकतो,
संपादक- न्यूज मसाला, नासिक.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।