निवृत्त वायुसेना अधिकाऱ्याचा विश्वनाथ सेवा समुहाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


विश्वनाथ सेवा समूहाचा, समाजोपयोगी उपक्रम
             नाशिक ( प्रतिनिधी)- आपल्या मुलामुलींचे विवाह योग्य वयात व्हावे ही सर्व पालकांची इच्छा असते. आपल्याला सुयोग्य जोडीदार मिळावा ही  युवक- युवतींची अपेक्षा असते. मात्र सध्याच्या काळात सर्व समाजात विवाह ठरविणे अतिशय जिकिरीचे झाले आहे. एकीकडे वय वाढत जाते व समस्या उग्ररुप धारण करते. यावर उपाय म्हणून सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी सतीश पेठकर यांनी विश्वनाथ सेवा समूहाची स्थापना केली आहे. त्याद्वारे ब्राह्मण समाजातील उपवर वधू - वरांसाठी विनामूल्य स्थळे सुचविण्यात येत आहेत.            पालकांनी विहित नमुन्यात आपल्या विवाहयोग्य मुला - मुलींची माहिती भरून फोटोसह पाठवावी. प्राप्त स्थळांच्या माहितीनुसार योग्य स्थळ सुचविले जाते. कुंडली पडताळणी करुन अठरा किंवा त्याहून जास्त गुण असलेली निवडक स्थळे पाठविण्यात येतात. त्यामुळे निवड करणे सोपे होते.याशिवाय आवश्यकतेनुसार विवाह जुळण्यासाठी मध्यस्थी व मार्गदर्शनही करण्यात येते. ज्यांचे वय वाढले आहे अशी विवाहेच्छू मुलेमुली तसेच विधुर, विधवा,घटस्फोटीत, दिव्यांग या वर्गवारीतील सर्वांना माहिती पाठवता येईल. या माध्यमातून विवाह निश्चित झाल्यावर वधू- वरांना भेटवस्तू देखिल देण्यात येते. अधिक माहितीसाठी २, शांताई, नंदनवन कॉलनी, कामटवाडे, नाशिक येथे तसेच ९२२६२१४९८९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजक व निवृत्त वायुसेना अधिकारी सतीश पेठकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)