कॉंग्रेसचा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ओबीसी मेळावा !




कॉंग्रेसचा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ओबीसी मेळावा ......

       नाशिक(प्रतिनिधी)::- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ओबीसी मेळावाच्या निमित्ताने महानगरपालिका व जिल्हापरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. या मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ओबीसी विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवी, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
              कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाच्या मेळाव्याच्या संदर्भात नियोजन बैठक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस भवन नाशिक येथे बुधवारी दुपारी पार पडली. या बैठकीला नाशिक जिल्हा ओबीसी विभागाचे अध्यक्ष सचिन कोठावदे, शहराध्यक्ष गौरव सोनार, प्रदेश सरचिटणीस अनिल कोठुळे, उपाध्यक्ष मिलिंद चित्ते, सरचिटणीस जैनू पठाण, सचिव मयूर वांद्रे, सहसचिव चारुशीला काळे, उत्तमराव बडदे,अशोक लहामगे,नंदकुमार येवलेकर,रोहन वेलदे, विशाल बागुल, विशाल सावंत, माया काळे, वैशाली थोरात, मौमुदिन शेख यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण भाजपच्या दुटप्पी भूमिकेमुळे गेले. भाजपचे महाराष्ट्राचे नेते राज्य सरकारला जबाबदार धरत असले तरी ओबीसींचा इम्पेरीकल डाटा केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला नाही त्यामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. ओबीसींचे आरक्षण मिळवण्यासाठी व आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त ओबीसींचे प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी ओबीसी मेळावा यशस्वी करावा अशी भूमिका सर्व पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यामुळे मेळावा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणार असल्याचे अभिवचन सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले. सुत्रसंचलन गौरव सोनार तर आभार मयूर वांद्रे यांनी मानले.        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।