शिवसेनेची वचनपूर्ती ! पर्यावरणपुरक आणि अद्ययावत उद्यानाचे लोकार्पण !


पर्यावरणपुरक आणि अद्ययावत मोहन रावले उद्यानाचे लोकार्पण !

मुंबईतलं नवं पर्यटन स्थळ शिवडी परिसरात !!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : २०१७ च्या मनपा निवडणुकीच्या वेळेस शिवसेना पक्षाद्वारे दिलेल्या वचननाम्यात सचिन पडवळ यांनी समस्त शिवडीकरांना एक वचन दिले होते की, या शिवडी विभागात एक सुंदर असे उद्यान उभारले जाईल. शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर ते स्वप्न अखेर पूर्ण झाले. वचननाम्याची, कर्तव्याची आणि उद्यानाची वचनपूर्ती झाली.
नगरसेवक सचिन पडवळ यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक २०६ मधील टी. जे. रोड येथील भारत इंडस्ट्रीज समोर "स्वर्गीय शिवसेना खासदार श्री. मोहन रावले उद्यानाचा लोकार्पण सोहळा" मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळेस मोहन रावले यांच्या पत्नी, मुलगी आणि परिवार देखील उपस्थित होते.
       या उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कार्यान्वित केलेली "माझी वसुंधरा" ही संकल्पना, सुशोभित प्रवेशद्वार, या उद्यानात "मियावाकी पद्धतीने" विलायती मेंधी, कदंब वृक्ष, पोफळी, नीम, कांचन वृक्ष, आवळा, वड, पिंपळ, ताम्हण, आंबा, करंज, अशोक, महोगनी वनस्पती, जांभूळ, बदाम, बकुळ, सागवान, चाफा अशी विविध प्रकारची ५०० झाडे, मल्लखांब, रेडिओ, योगा शेड, मुलांसाठी खेळणी, आकर्षक विद्युत रोषणाई, आकर्षक बैठक व्यवस्था, परगोला, सुसज्ज सुरक्षा रक्षक माळी चौकी अशा प्रकारचे शिवडीकरांसाठी नवे संजीवनी देणारे उद्यानच नव्हे तर मुंबईचे नवे पर्यटन स्थळ बनविण्यात आले आहे.
          गेल्या पन्नास वर्षांपासून शिवडी परिसरातील जनतेला चिरपरिचित आत्महत्येचा केंद्रबिंदू असलेला 'मौत का कुवा' म्हणजेच चायना मिलचा खाडा. या जागेची पार्श्वभूमी म्हणजेच येथील चायना मिल मध्ये कपडा बनल्यानंतर धुलाई विभागातलं रासायनिक पाणी हे या तलावामध्ये सोडले जायचे. त्यामुळे याजागी चिखल व्हायचा. या तलावामध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले होते. शेकडो आत्महत्या या तलावात झाल्या आणि प्रसारमाध्यमांतून या तलावाचे 'मौत का कुवा' असे नामकरण झाले. आमदार दगडू दादा सकपाळ यांच्या कार्यकाळात तो खाडा बुजवून टाकण्यात आला. गेली १० वर्षे ती जागी मोकळीच पडून राहिली होती. आज त्याच जागेवर पर्यावरणपुरक आणि अद्ययावत उद्यान दिमाखात उभं राहिलं आहे. या उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यात शिवसेना खासदार अरविंद सावंत, शिवसेना आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख आशिष चेंबुरकर, माजी आमदार दगडु दादा सकपाळ, स्थापत्य समिती अध्यक्ष दत्ता पोंगडे, विधानसभा संघटक सुधीर साळवी, उप विभागप्रमुख गजानन चव्हाण, उप विभागप्रमुख पराग चव्हाण, नगरसेविका सिंधुताई मसूरकर, माजी महापौर/नगरसेविका श्रद्धा जाधव, विधानसभा महिला संघटिका लता रहाटे, उप विभागसंघटिका श्वेता राणे, उप विभागसंघटिका रूपाली चांदे, शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे, शाखासंघटक शुभदा पाटील यांच्यासोबत शिवडी विधानसभेतील सर्व पुरूष महिला पदाधिकारी तसेच शिवडीकर जनता उपस्थित होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।