धर्मांतर - सद्यस्थितीतील कारणे आणि उपाय या विषयावर २६ फेब्रुवारी रोजी व्य़ाख्यानाचे आयोजन !!


स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त

सावरकर भक्तांचा मेळावा आणि व्याख्यान !

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्ताने शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी सकाळी १० वाजता दादर येथील पाटील मारूती सभागृहात सावरकर भक्तांचा मेळावा तसेच धर्मांतर - सद्यस्थितीतील कारणे आणि उपाय या विषयावर समीर दरेकर यांचे व्य़ाख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम हिंदुमहासभा मुंबईच्या वतीने होत आहे. यावेळी हिंदुमहासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप केणी उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश भोगले असतील. अधिकाधिक देशभक्तांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !