थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार २०२५–२६ जाहीर !
थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार २०२५–२६ जाहीर ! नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी ३ जानेवारी रोजी महिला शिक्षिकांना दिला जाणारा थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार सन २०२५–२६ साठी जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शिक्षिकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. सन २०२५–२६ करिता जिल्ह्यातील सर्व गटांतून प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांची गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत गट बदल करून सखोल पडताळणी व गुणांकन प्रक्रिया राबविण्यात आली. शिक्षिकांचे वर्गस्तरीय अध्यापन कार्य, विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न, सहशालेय उपक्रम, सामाजिक व शैक्षणिक योगदान या विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले. पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्तावांमधून शासनाने ठरवून दिलेल्या किमान अटी व शर्ती तसेच सर्व निकष पूर्ण करणाऱ्या शिक्षिकांमधून एकूण १५ गुणवंत शिक्षिकांची निवड करण्यात आली. ही निवड अध्यक्ष, जिल्हा गुणवंत शिक्षिका पुरस्कार निवड समिती तथा प...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा