मराठा मोर्चाने ओलांडली महाराष्ट्राची वेस ! वडोदरा येथे राष्ट्रीय संघटन कार्यालयाचे उदघाटन !


मराठा मोर्चाने ओलांडली महाराष्ट्राची वेस !

वडोदरा येथे राष्ट्रीय संघटन कार्यालयाचे उदघाटन !

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात सुरू झालेल्या मराठ्यांच्या संघटनात्मक चळवळीने महाराष्ट्राची वेस ओलांडत थेट वडोदरा, गुजरात गाठले. राष्ट्रीय संघटन कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने येथे दिग्गज मराठा, मराठ्यांचे मोठे राष्ट्रीय संघटन उभारण्याच्या हेतूने एकत्र आले होते.
        सदर कार्यक्रमासाठी एनकेजीएसबी  बँकेच्या संचालक मंडळाच्या चुरशीच्या  निवडणुकीत प्रतिनिधीत्व करणारे "आशिर्वाद पॅनेल" चे लढवय्ये नेतृत्व प्रेमानंद श्रीनिवास शानभाग आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह गायकवाड, संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, गुजरात राज्यप्रमुख देवेश माने आणि बडोदा जिल्हाप्रमुख प्रदिप मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उज्वलसिंह गायकवाड यांनी प्रेमानंद श्रीनिवास शानभाग आणि त्यांच्या सहकार्‍यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केले. 
         सत्काराला उत्तर देताना प्रेमानंद शानभाग म्हणाले, "अवघ्या मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आपण उभा केलेला 'एक मराठा, लाख मराठा' लढा महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशात गाजत आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आणि सनदशीर मार्गाने हा लढा व्यापक होत आहे. हेच मराठा समाजाचं यश आहे. मराठ्यांनी बदलत्या काळाची पावले अचूक ओळखली आणि आरक्षणाच्या चळवळीतून उभं केलेलं अखिल राष्ट्रीय संघटन आणि आता मराठा युवकांच्या स्वप्नपुर्तीसाठी एकवटलेले पाहून आम्हांला अत्यानंद होत आहे. मराठा समाज आणि विशेषतः युवकांना उद्योगधंद्यामध्ये उभं करण्यासाठी अश्विनी भोसले (सहचिटणीस), संदीप भोसले (प्रमुख कार्यवाह), अनिल कदम (महाराष्ट्र उपाध्यक्ष) तसेच त्यांच्या अन्य सहकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली. एनकेजीएसबी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर माझं "आशिर्वाद पॅनेल" आणि माझे सहकारी मराठा समाजाच्या युवकांना उद्योजक होण्यासाठी जे सहकार्य लागेल ते योग्यप्रकारे करू." अवघ्या मराठा समाजाने "आशिर्वाद पॅनेल" ला भरघोस मतांनी विजयी करण्याचा निश्चय करा, अशी विनंतीही त्यांनी यानिमित्ताने केली.
राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह गायकवाड म्हणाले, "इतिहास सांगतो स्वराज्याच्या स्थापनेसाठी लागणारा निधी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटून मिळवला पण इथे तर प्रत्यक्ष लक्ष्मीच एनकेजीएसबी  बँकेच्या संचालकांच्या रुपाने चालत समारंभ स्थळी आली आहे. मराठा समाज आर्थिक सक्षम करण्यासाठी शानभाग आणि त्यांचे सहकारी तयार आहेत. पण आत्ताच्या घडीला "आशिर्वाद पॅनेल" ला मराठा समाजाची एकत्रितपणे साथ मिळणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी मराठा समाजाचे जे  सहकारी एनकेजीएसबी बँकेचे सभासद आहेत त्यांनी आपलं हक्काचं मत "आशिर्वाद पॅनेल" ला द्यावं आणि आपल्या परिचितांना देखील हा संदेश पोहचवावा, अशी विनंती करतो."
अॅडव्होकेट मानसी सबनीस म्हणाल्या, "छत्रपती शिवरायांनी "श्रीं" च्या  राज्याची निर्मिती कशी केली असेल? हा प्रश्न शिवराज्य इतिहासाचा अभ्यास करताना मला नेहमी पडायचा. एका व्यक्तीच्या निव्वळ शब्दाखातर जिवावर उदार होत मराठे लढले हा इतिहास आहे. त्याच इतिहासाचा पुन्हा चमत्कार होताना आपण पाहणार आहोत. 'राजांचा आदेश आणि मराठ्यांचा पण' तिथेच "आशिर्वाद पॅनेल" चा विजय पक्का झाला आहे. "आशिर्वाद पॅनेल"च्या यशासाठी मनाच्या गाभाऱ्यातून धडपडणाऱ्या प्रत्येक मराठा युवक युवतीच्या उत्कर्षाचा, आर्थिक सक्षमतेचा आणि व्यावसायिक क्षेत्र पादाक्रांत करण्याचा मंत्र घेऊन प्रत्येकाने कामाला लागलं पाहिजे. प्रचारासाठी मिळालेला प्रत्येक दिवस सत्कारणी लावण्यासाठी प्रत्येकाने झटलं पाहिजे. कोणीतरी फोन करून सांगितलं पाहिजे "अहो तुमची माणसं तुमच्या "आशिर्वाद पॅनेल" चे निवडणूक प्रचारपत्र घेऊन आमच्या दारी आली आहेत." तेंव्हा अंगावर मुठभर मांस चढेल आणि धन्य धन्य वाटेल."
एनकेजीएसबी बँकेच्या संचालक पदाची निवडणूक रविवारी २७ फेब्रुवारी २०२२ रोजी होत आहे. तेव्हा आपल्या जवळच्या शाखेत जाऊन "आशिर्वाद पॅनल"च्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !