रसिकांना मिळाली लतायुगाची सुरेल अनुभूती !




रसिकांना मिळाली लतायुगाची सुरेल अनुभूती !

        नाशिक ( प्रतिनिधी ):- स्वर्गीय भारतरत्न लतादीदींची सुरेल गाणी सादर करून काल नाशिकच्या गायिका व गायकांनी भावस्वरांची सुरांजली अर्पण केली. गायिकांनी सोलो गाणी गाऊन आपली स्वरसमिधा वाहिली. गायकांनी युगलगीतात स्वरसाथ दिली. रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहून लतायुगाची अनुभूती मिळवली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफलीत स्वरसम्राज्ञी लतादीदींच्या सुरेल आठवणींना उजाळा मिळाला.प्रारंभी प्रमुख पाहुणे संगीतकार संजय गीते, गायक संजय किल्लेदार, पत्रकार संजय देवधर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.गीतेंनी अनुभव सांगितले.
            नंदकुमार देशपांडे संचलित सरगम म्युझिक अकॅडमीतर्फे काल शनिवारी ( दि.२६) भारतरत्न लतादीदींना भावस्वरांची सुरांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ' मेरी आवाज ही पहेचान है..' ही सुरेल मैफल पंचवटी कारंजा जवळ लक्ष्मीबाळ सदन सभागृहात सायंकाळी झाली. तेरे बिना जिया जाए ना..., जिंदगी प्यार का गीत है..., दिल दिवाना बिन सजना के..., ए हवा मेरे संग संग चल..., सायोनारा सायोनारा..., तुम ही मेरे मंदिर..., ए मेरे वतन के लोगो... या हिंदी गीतांबरोबरच मोगरा फुलला..., अखेरचा हा तुला दंडवत... ही मराठी सोलो गाणी गायिकांनी सादर केली. अपर्णा माडीवाले, वर्षा कुलकर्णी, स्मिता पांडे, प्राजक्ता गायधनी, नीलम टकले, हर्षदा पुजाधिकारी, पूनम सारंगधर, अर्चना सोनवणे, सुगंधा शुक्ल, सुवर्णा यादव, सारिका वाघमारे  यांचा त्यात समावेश होता. 
       ओ सनम तेरे हो गए हम..., युही तुम मुझसे प्यार करते हो..., ये रात भिगी भिगी..., दिल पुकारे आरे आरे..., वादा करले साजना..., एक प्यार का नगमा है..., या व अश्या विविध युगुल गाण्यांमध्ये घनश्याम पटेल, प्रमोद दीक्षित, सुयोग वाघमारे,  प्रमोद कापडणे, उमेश मालवी, राजेंद्र पैठणे, धनंजय भावसार, सुरेंद्र जालीहालकर, नाना मुरगुंडे, संदीप कोते यांनी सुरेल स्वरसाथ दिली. सर्व गाण्यांना कराओके म्युझिक सिस्टीमची संगीतसाथ होती. निवेदिका मनाली गर्गे यांनी लतादीदींच्या आठवणींना उजाळा देत उत्तम निवेदन केले व शब्दसुरांची मैफल उत्तरोत्तर रंगवत नेली.

 

टिप्पण्या

  1. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. सर्व कलाकारानी उत्कृष्ट सादरीकरण केले. नंदकुमार देशपांडे यांनी चांगला उपक्रम सादर केला. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला शोभा आली.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !