आज शिवजिजाऊ पुरस्कार वितरण ! खासदार उदयनराजे भोसले व नानासाहेब जावळे यांची प्रमुख उपस्थिती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

शिवजिजाऊ पुरस्कार व मराठामित्र सन्मान सोहळा!

        नाशिक::---अखिल भारतीय छावा युवा संघटना यांच्यावतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व कोपर्डीच्या ताईसाठी लढणाऱ्या युवकांचा व भारतीय लष्करात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबायांचा राजमाता जिजाऊ भोसले यांच्या जयंती निमित्त 'शिवजिजाऊ पुरस्कार व मराठामित्र सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, नानासाहेब जावळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पवन नगर स्टेडियम नवीन नाशिक येथे आज दि.१९ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५:०० वा.आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिवशाहीर सुरेश जाधव संभाजी नगर यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेश गांगुर्डे, आशिष हिरे व आयोजकांनी केले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गौतमी गोदावरी धरणातील बेटावर त्र्यंबकराजांची प्रतिकृती उभारणार

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद, देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सवाचे ४ व ५ सप्टेंबर रोजी आयोजन...!