कोण म्हणते, मराठा जातीयवादी आहे !! थोडक्यांत मांडलेल्या विचारांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

कोण म्हणते , मराठा जातीयवादी आहे, विचारून तर बघा एकदा नवनिर्वाचित आमदार दराडे बंधूंना, व शिवसेनेला !
किती मते होती वंजारी समाजाची, याचा अभ्यास करा ?
पैसे जे, निवडणुकीत वाटले जायला नकोत या मताचा मी पण आहे, पण कोणी एकानेच वाटलेत की अनेक उमेदवारांनी ?
मग फक्त दराडे व विकले गेलेले मराठाच दोषी आहेत का ?
बोटावर मोजण्या इतकी वंजारी समाजाची मते असतांना मराठा समाजाने दरांडेंना मतदान केले व दोन्ही बंधू निवडून आलेत यां विजयांतील सर्वात मोठा वाटा मराठा समाजाचा आहे, हे कुणीही नाकारू शकत नसतांना विनाकारण मराठा समाज जातीयवादी आहे अशी बदनामी का होतेय ?  हाकाटी पिटविणाऱ्यांनो जर खरोखर मराठा समाज जातीयवादी असता वा तसा वागला असता तर निवडणुकीचा निकाल काय असता ? याचा विचार करा !!
सकल मराठा समाज एक आहे पण जातीयवादी राजकारणापासुन कोसो दूर आहे नासिक  मतदार संघातील दोन्ही विधानपरिषद निवडणुक निकालावरून स्पष्ट होत असतांना विनाकारण बदनामी का केली जातेय ? या मागील षडयंत्राचा  अभ्यास करणे हा यामागील मुळ मुद्दा ठरू शकतो , त्याचा अभ्यास ज्यांना गरज आहे ते करतीलही, तुर्तास जातीयवादाला पसरवू नका,
फक्त नासिक जिल्ह्याची ( उर्वरीत चार जिल्हांचीही धरल्यास गणितात खुप मोठा बदल होईल) लोकसंख्या कोटीच्या पुढे असतांना या दोन्ही निवडणुकांत 650 व 51000 ईतकेच मतदार होते याचा अर्थ एकुण लोकसंख्येच्या फक्त पाच टक्के मतदारांच्या मतांना धरून 95 टक्के जनतेच्या मनांत जातीयवादाचे विष पेरणे म्हणजे काय ?
काहीही असो, दराडे बंधू, शिवसेनेबरोबर मराठा समाजाला बदनाम करणाऱ्या चाटगीरी प्रव्रुत्तींचाही विजय झाला असे दिसते,
निवडणुकीत जय-पराजय होतच राहतात,
आम.नरेंद्र दराडे व आम. किशोर दराडे यांना विजयाच्या शुभेच्छा !!!

Comments

 1. तुम्ही मांडलेला मुद्दा हा रास्त आहे,केवळ मराठा समाजाची लोकसंख्या मोठी आहे,तिला घाबरूनच इतर काही जातीतील देष्ट्ये लोक मराठयांना जातीयवादी म्हणून बदनाम करीत आहे,आद्यपतरी मराठा जातीयवादी झालेला नाही मात्र सर्व समाजाकडून मराठ्यांना टार्गेट केले जात आहे त्यामुळे त्रस्त होऊन मराठा जातीयवादी होऊ शकतो

  ReplyDelete
  Replies
  1. आपण व्यक्त केलेली शंका रास्त आहे पण असे सर्व समाजबांधवांच्या व सामाजिक सौहार्द-सलोख्यासाठी घडू नये असे वाटते.
   धन्यवाद, आपण लिंकला रिस्पान्स दिल्याबद्दल,

   Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ! ८ जानेवारीला देशव्यापी संप !! अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!