न्यूज मसालाच्या अकराव्या "लोकराजा" दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन !

न्यूज मसालाच्या अकराव्या "लोकराजा" दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन !

नासिक::- "लोकराजा" दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन साप्ताहिक न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना स्पर्धेत निवड व गौरव पुरस्कार तसेच काव्यमंच पुरस्कारासह अनेक मान्यवरांनी गौरविलेल्या, मुखपृष्ठावर आजी-माजी संसद सदस्याचे छायाचित्र प्रकाशित करण्यात येणारा "एकमेव" दिवाळी अंक "लोकराजा" !

 "लोकराजा" दिवाळी अंक यंदा ११ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मराठी साहित्यिक विचारांचा गौरव व नव साहित्यिकांच्या लेखनाला यथोचित सन्मानाने स्थान देण्याचा मानस या वैशिष्ट्यांसह "लोकराजा" अंकाने सर्वदुर सहस्रावधी वाचकांची आवड जोपासली आहे. लेखक, कवी, विचारवंतानी आपण स्वत: लिहिलेली साहित्य कृती (कथा, कविता, ललित लेख यापैकी फक्त एकच साहित्य रचना ) खालील पत्यावर पोष्टाने किंवा ई-मेल १० आॅगस्ट २०२२ पर्यंत पाठवावे. कथा, कविता, लेख यांना विषयाचे बंधन नाही मात्र अश्लिलता विरहीत असावे. आपली भारतीय संस्कृति, चाली रिती जोपासणारे साहित्य अपेक्षित आहे . शब्दमर्यादा --
कथा १५०० शब्द , लेख १००० शब्द, कविता १०० शब्द आहे, (विषयाच्या अनुषंगाने कमी जास्त, दिर्घ कथा यथोचित मर्यादा) आपली कोणतीही एक उत्कृष्ट साहित्य रचना पुढील पत्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे, 
पत्ता - 
संपादक, न्यूज मसाला, लोकराजा दिवाळी अंक २०२२
३०३, राॅयल होम्स, कॅनडा काॅर्नर, शरणपूर, नासिक, ४२२००२
किंवा
Email- newsmasala1@gmail.com
अधिक माहितीसाठी मो. 7387333801 वर संपर्क करावा. धन्यवाद ।

टिप्पण्या

  1. हार्दिक अभिनंदन सर. दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवतो

    उत्तर द्याहटवा
  2. अभिनंदन, दिवाळी अंकासाठी माझी कविता मी पाठवीन

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)