मे. तहसीलदार चर्चेचा विषय ठरले ! मग चर्चा तर होणारच !! काय केले मे. तहसीलदारांनी, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

संतोष गिरी यांजकडून,
न्यूज मसाला सर्विसेस,
  
    नासिक::- निफाड तालुक्याचे तहसीलदार म्हणून असलेले दीपक पाटील हे आज चर्चेचा विषय ठरले आहेत. आपल्याला मिळालेल्या शासकीय वाहनाने  लासलगाव-विंचूर रस्त्याने जात असताना त्यांचा कडून झालेल्या कार्यामुळे चर्चा होत आहे. यापूर्वीही त्यांनी आपल्या कामकाजातून अनेक घटनांतून संवेदनशील अधिकारी असल्याचे  दाखवून दिले आहे.
     काल दि. २७ जुलै रात्री विंचूर रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे दीपक पाटलांची माणुसकी व संवेदनशीलतेचा जनतेला प्रत्यय आला, कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्हा भरात नव्हे तर महाराष्ट्रात वाढत चाललेला असतांना संकटसमयी ही मदतीला धावणारे विरळाच, गाडीला लिफ्ट मागितली तर ती मिळत नाही, अनोळखी व्यक्तिला गाडीवर बसवून घ्यायला तयार नाही, जो तो सोशल डिस्टन्स ठेवण्याचा प्रयत्न करत कोरोनाच्या  प्रादुर्भावापासून अलग करीत आहेत, अशा वेळी  दोन तरूण अपघात होऊन रस्त्यावर पडलेले असताना निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी सरकारी गाडीत त्यांना उचलून टाकत त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल केले,  या दोघा तरुणांना कोरोणाच्या काळात एक प्रकारे जीवनदान दिल्याने माणुसकीचा झरा अजून जिवंत असल्याचे दिसते.
           दीपक पाटील सोमवारी सायंकाळी शहरातील शिव रस्ता भागाची पाहणी करण्याकरिता निघाले होते. सायंकाळी उशिरा अंधारात या शिव रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले होते. त्यावेळी या जखमी झालेल्या तरुणांना कोणीही दवाखान्यात नेण्याचे धाडस दाखवले नाही, त्या वेळी निफाडकडे परतत असलेले तहसीलदार दीपक पाटील यांनी  जखमी तरुणांना पाहताच गाडीतून खाली उतरत सहकाऱ्यांना सोबत घेत या जखमींना सरकारी गाडीत टाकत त्यांना निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
          राजेंद्र लक्ष्मण भारुडे व गोरख अभिमान अहिरे या दोन आदिवासी कामगारांना वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला आहे. निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात यावेळी उपस्थित असलेले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी या तरुणांवर तातडीने उपचार केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणूस माणसाला विचारायला तयार नाही अशा परिस्थितीत निफाडच्या तहसिलदारांनी स्वतःच्या सरकारी वाहनातून अपघातग्रस्तांना मदत केल्याने संवेदनशीलतेची चर्चा तर होणारच !
_________________________________________
संदेश माणुसकीचा--
         शासनाकडून प्रशासकीय अधिकारी वर्गाला वाहन दिले जाते ती जनतेच्या सेवेसाठी,  मी जनतेची सेवा करण्यासाठी तहसीलदार असलो तरी, प्रथम मी देशाचा नागरिक आहे व संकट काळात कुठलाही नागरिक संकटात सापडल्यानंतर माझी नैतिक जबाबदारी ही आहे की त्याला मदत करणे,
         कालच्या घटनेत जखमी झालेल्या युवकांना मी त्याच पद्धतीने मदत करण्यासाठी थांबलो व त्यांना दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर वेळीच उपचार झाले.  त्यात तरुणांचे प्राण वाचल्याने खऱ्या अर्थाने समाधान वाटले, प्रशासकीय अधिकारी वर्गाला सर्व गोष्टींचे भान ठेवून "जनता आमच्या आमच्यासाठी नाही, आम्ही जनतेसाठी आहोत"  हेच यातून मला माझ्या सर्व प्रशासकीय मित्रांना सांगायचे आहे, अपघातग्रस्तांवर वेळीच उपचार झाले नाहीत तर मदतीअभावी जीव गमवावा लागतो,  अशी घटना  कुठे घडली, निदर्शनास आली तर प्रशासकीय यंत्रणेने आपले प्रथम कर्तव्य समजून मदत करावी असे आवाहन मी तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाला करतो.
              दीपक पाटील, तहसीलदार, निफाड.
__________________________________________

टिप्पण्या

  1. साहेब आप्ल्यसारखे अधिकारी आज मितिस नाहित.हा आशिर्वाद प्रत्येकाला घेता येत नाही.असेच कार्य पुढिल आयुष्यातही कराल यात शन्का नाही.पर्मेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.
    केदारे आर.के.नाशिक

    उत्तर द्याहटवा
  2. तहसीलदार साहेब हे पूर्वी जि.प.शिक्षक होते आज मला त्यांनी केलेल्या कार्याचा एक शिक्षक म्हणून अभिमान वाटत आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !