सेन्सेक्स अाजही हिरवा
सेन्सेक्स अाजही हिरवा
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : १० मार्च रोजी सलग तिसऱ्या दिवशी बाजार उच्च पातळीवर बंद झाला. सर्व क्षेत्रांतील खरेदीमुळे मदत झाली. पाच राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू झाल्यामुळे आणि युक्रेन-रशिया चर्चेतील सकारात्मक निकालाच्या आशेवर, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात वाढ झाली. ही खरेदी मोठ्या प्रमाणावर व्यापक आधारावर होती, केवळ धातू क्षेत्रावर दबाव होता.
एचयूएल, टाटा स्टील, ग्रासिम इंडस्ट्रीज, जेएसडब्लू स्टील आणि एसबीआय हे निफ्टी वाढवणाऱ्या प्रमुख कंपन्यांमध्ये होते. दुसरीकडे, कोल इंडिया, टेक महिंद्रा, डॉ. रेड्डीज लॅब्स, ओएनजीसी आणि टीसीएस यांची सर्वाधिक घसरण झाली.
ऑटो, मेटल, एफएमसीजी, पॉवर, कॅपिटल गुड्स, पीएसयू बँक आणि रिअल्टी निर्देशांकांमध्ये १-२ टक्क्यांची भर पडली. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले.
निफ्टी १६,५०० च्या वर; तर ऑटो, मेटल, एफएमसीजी, पॉवर, कॅपिटल गुड्स, पीएसयू बँक आणि रिअल्टी यांच्या नेतृत्वाखाली सेन्सेक्सने ८०० अंकांनी जोरदार उसळी घेतली. सेन्सेक्स ८१७.०६ अंकांनी किंवा १.५०% वर ५५,४६४.३९ वर आणि निफ्टी २४९.५५ अंकांनी किंवा १.५३% वर १६,५९४.९० वर होता. सुमारे २४३४ शेअर्स वाढले आहेत, ९२८ शेअर्समध्ये घट झाली आहे आणि ९८ शेअर्स अपरिवर्तित आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया ७६.४१ वर बंद झाला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा