जिल्हा परिषदेत आरोग्य सहाय्यिका पदी पदोन्नतीसह समुपदेशनाने पदस्थापना !न्यूज मसाला वृत्तसेवा, 7387333801

जिल्हा परिषदेत १२ महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यिका पदी पदोन्नती सह समुपदेशनाने पदस्थापना !

नाशिक : आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आरोग्य सेविका या संवर्गातून आरोग्य सहाय्यिका या संवर्गात १२ महिला कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नतीने पदस्थापना दिली. पदोन्नती दरम्यान समुपदेशनासाठी अपंग, दुर्धर आजाराने त्रस्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले, यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे, पदोन्नती समितीचे अधिकारी आदी उपस्थित होते. समुपदेशनाने पदोन्नतीची प्रक्रिया पार पडल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत मुख्य कार्यकारी अधिकारी व पदोन्नती समिती व आरोग्य विभागातील संकलन, सहायक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!