दिव्यांगांच्या सेवेसाठी कायमस्वरूपी केंद्राचे लोकार्पण ! मारवाडी युवा मंच, समकित ग्रुप, महावीर सेवा फाउंडेशन, उमीद फाऊंडेशन, नवकार आशिष ग्रुप



न्यूज मसाला वृत्तसेवा,
7387333801

दिव्यांग (अपंग) सेवेसाठी कायमस्वरूपी केंद्राचे लोकार्पण !

नाशिक (प्रतिनिधी ):- नव्या पिढीतील युवा कार्यकर्ते उत्तम सेवाकार्य करीत आहेत. त्यांना समाजाने सहकार्य करावे. नुकतेच ३२ खोल्या असणारे वसतिगृह घेण्यात आले आहे. तेथे अनेक गरजू विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. दिव्यांगांच्या सेवेसाठी महावीर धर्मार्थ दवाखान्यात कायमस्वरूपी विनामूल्य केंद्र सुरू करण्यात आले असून त्याचे लोकार्पण करण्यात येत आहे असे प्रतिपादन जे. सी. भंडारी यांनी केले. ७५ दिव्यांग व्यक्तींना जयपूर फूट वितरण प्रसंगी ते बोलत होते.
          नवकार आशिष सेवा ट्रस्ट तर्फे काल रविवारी ( दि.२७) श्री महावीर धर्मार्थ दवाखाना संचलित आरएमडी हॉस्पिटलमध्ये ७५ गरजू विकलांग व्यक्तींना जयपूर फूट वितरित करण्यात आले. त्यासाठी पुण्याच्या साधू वासवानी ट्रस्टने सहकार्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे. सी. भंडारी होते. ते म्हणाले, नवकार आशिष सेवा ट्रस्ट तर्फे गेल्या चार वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पुस्तके देण्यात येतात. रक्तदान शिबिरे व रुग्णांवर विनामूल्य उपचार करण्यात येतात. संस्थेला ८० जी अंतर्गत देणग्या द्याव्यात असे आवाहन त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर  साध्वी प्रितीसुधाजी,  ग्यानप्रभाजी यांच्या शिष्या पुष्पचुलाजी तसेच आभाजी व विभाजी म सा उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिजलाल कटारिया, नरेंद्र बाफना, प्रकाश गांधी व बालचंद मुग्धिया  उपस्थित होते. विश्वस्त संदीप गांग यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अश्विनी कांकरिया यांनी स्वागतगीत सादर केले.
              या कार्यक्रमाला आचार्य आनंदऋषीजी महाराजांचा ३० वा स्मृतिदिन, उत्तर भारतीय प्रवर्तक राष्ट्रसंत आशिषमुनींचा ७० वा जन्मदिन व आभाजी - विभाजी यांचा १८ वा दीक्षादिन असा दुग्धशर्करायोग जुळून आला. सुरुवातीला आनंदचालिसा पठण झाले. उपस्थित गरजू विकलांग लाभार्थीना जयपूर फूट प्रदान करण्यात आले.यावेळी स्वतःच्या पायावर उभे राहिल्याचा त्यांचा आनंद कार्यकर्त्यांचे बळ वाढविणारा होता. प्रितीसुधाजी म. सा. नियमदर्शनाजी म. सा. आणि आभाजी म. सा. यांचे प्रवचन झाले. कार्यक्रमाला पारस साखला, शशिकांत सुराणा, नंदलाल पारख, शंकरलाल गांग, कांतीलाल कोठारी, सुभाष लुणावत,  पोपटलाल नहार, उमेश भंडारी,रवी लुणावत, साधू वासवानी ट्रस्टचे डॉ. साहिल जैन, जाधव, धनराज संचेती उपस्थित होते. सौ. लता मोहनलाल लोढा यांनी भोजन प्रसादासाठी सहकार्य केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी  मारवाडी युवा मंच, समकित ग्रुप, महावीर सेवा फाउंडेशन, उमीद फाऊंडेशन तसेच नवकार ग्रुपच्या युवा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत:- सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम !ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !