स्पीड न्यूज २४ च्या कार्यालयास राजा माने यांची सदिच्छा भेट !


स्पीड न्यूज २४ ही कोल्हापूरची ओळख बनू पाहतेय : दसरा चौक शाखा कार्यालयास सदिच्छा भेट !


      कोल्हापूर(प्रतिनिधी)::- स्पीड न्यूज २४  ही मराठी वेब वृत्तवाहिनी कोल्हापूरची ओळख बनू पाहतेय. खर तर पुढचा काळ हा डिजीटल मिडीयाचा काळ आहे असे आपण नेहमी म्हणतो, परंतु माझ असं मत आहे, की काळ कुठला ही असो मल्टीमिडीया हा भारतीय माध्यम जगताचा आत्मा राहणार आहे, ज्यामध्ये स्पीड न्यूज २४ हे आघाडीवर राहील, कोल्हापुरचा नावलौकीक वाढवत राहिल याची खात्री मला वाटते, असा विश्वास सोलापूर तरुण भारतचे मुख्य समूह संपादक आणि डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी व्यक्त केला. गुरुवार दिनांक १० मार्च रोजी त्यांनी स्पीड न्यूज २४ चॅनेलच्या दसरा चौक शाखेला सदिच्छा भेट दिली. यावेळी स्पीड न्यूज २४ प्रा. लि. चे व्यवस्थापकिय संचालक व मुख्य संपादक एकनाथ पाटील, संपादक सुहास पाटील, ‘वूमन्स क्लब’ च्या प्रेसिडेंन्ट स्वप्नाली जगोजे यांनी त्यांचे स्वागत केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा परिषदेतील ५१ परिचर यांना कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती !

प्रेरणादायी गोष्टींमधून विशेष बालकांनी अनुभवले छत्रपती शिवाजी महाराज !

बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले १००० दिवस महत्वाचे !