राज्यातील पूर्ण झालेला पहीलाच ठरलेल्या प्रकल्पाचे गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

राज्यातील पूर्ण झालेला पहीलाच ठरलेल्या प्रकल्पाचे गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण ! 

स्वच्छ भारत अभियानाच्या प्रकल्प संचालकांकडून गोबरधन प्रकल्पाची पाहणी !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801

         नाशिक(प्रतिनिधी):: - स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने येवला तालुक्यातील अंदरसूल ग्रामपंचायतीमध्ये पुर्ण करण्यात आलेल्या गोबरधन प्रकल्पाची स्वच्छ भारत अभियानाचे प्रकल्प संचालक व युनिसेफच्या प्रतिनिधींकडून पाहणी करण्यात आली. 

 
               जिल्हयात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासह स्वच्छतेच्या विविध घटकांवर काम करण्यात येत आहेत. प्रायोगिक तत्वावर प्रत्येक जिल्हयात एका गावामध्ये गोबरधन प्रकल्प राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. जनावरांची संख्या, लोकसंख्या, शेतीमध्ये निर्माण होणारा कचरा या निकषावर गोबरधन प्रकल्पासाठी येवला तालुक्यातील अंदरसुल गावाची निवड करण्यात आली. राज्यस्तरावरुन नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक संस्थेकडून गावाचे सर्वेक्षण, आराखडा, अंदाजपत्रक इ. काम पूर्ण करण्यात आले. यानंतर या कामाचे ई टेंडर करण्यात आले. यामध्ये पात्र ठरलेल्या संस्थेला कार्यारंभ आदेश देण्यात येऊन फेब्रुवारी २०२३ मध्ये सदरचा प्रकल्प पुर्ण झाला आहे. विशेष म्हणजे राज्यातील पूर्ण झालेला हा पहिलाच प्रकल्प ठरला आहे.

             पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत् स्वच्छ भारत मिशन (ग्रा) चे प्रकल्प संचालक शेखर रौंदळ, युनिसेफचे प्रतिनिधी जयंत देशपांडे यांनी आज अंदरसूल येथे भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी अन्सार शेख्, सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदरस्य,  ग्रामसेवक, गट समन्वयक आदि उपस्थित होते.
               दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचे काम विहित वेळेत पूर्ण करण्यात असून दूरदृश्य प्रणालीव्दारे पाणी व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व  पालकमंत्री दादाजी भुसे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत सदर प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।