बाजार समित्यांची रणधुमाळी ! २०२०-२२ मध्ये बांधण्यात आलेले शेड "कळीचा मुद्दा" ठरणार !!

बाजार समित्यांची रणधुमाळी !
२०२०-२२ मध्ये बांधण्यात आलेले शेड "कळीचा मुद्दा" ठरणार !!

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801

      नासिक ::- जिल्ह्यातील अनेक बाजार समितींमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेक मातब्बरांनी सुरुवात केली आहे, सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्या मोर्चेबांधणीला शह-काटशह कसा द्यायचा याची रणनिती आखली जात असताना मागील पंचवार्षिक मध्ये असलेल्या विरोधकांनी व इतर इच्छूक उमेदवारांनी सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार शोधायला सुरुवात केली आहे.



याबाबत बाजार समितींमध्ये २०२०-२२ मध्ये बांधकाम करण्यात आलेल्या शेतमाल लिलाव शेड, कांदा लिलाव शेड सारखे मुद्दे "भाव" खाऊन जाण्याची शक्यता आहे. आतापासूनच, झालेल्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सदरील कामे टेंडर स्पेसिफिकेशननुसार व दरसूची (इस्टिमेट) प्रमाणे झालेले नाहीत अशी चर्चा सुरू आहे.




सदर कामांची तांत्रिक तपासणी त्रयस्थ संस्थेकडून व्हावी व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा मुद्दा मतदारांपुढे मांडला जात आहे. या एकाच मुद्यावर काही बाजार समितींमध्ये अनेकांना पुन्हा निवडून येण्यासाठीचा प्रयत्न "मैलाचा दगड" ठरला नाही म्हणजे मिळवले !



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !