यापुढे तालुका कृषी अधिकारी दाखला देण्यास सक्षम !

यापुढे तालुका कृषी अधिकारी दाखला देण्यास सक्षम !
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801,

        पुणे::- शेतकरी कुटुंबातील महिलांना इच्छा असूनही शेतकरी उत्पादक कंपनीत सहभागी होता येत नव्हते कारण कंपनी निबंधकांकडून त्यांच्याकडे शेतकरी दाखल्याची मागणी केली जात होती, या एका मुद्यावर अनेक होतकरू महिलांना आपल्या स्वप्नांना मुरड घालावी लागत होती. शेतकरी कुटुंबातील महिला आणि अन्य सदस्य ज्यांच्या नावावर जमीन नाही त्यांना हा दाखला मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे, शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असत. यावर कृषी आयुक्तांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

शेतकरी कुटुंबातील महिलांना दाखला उपलब्धतेबाबत तालुका कृषी अधिकारी यांना परिपत्रक काढले आहे. यापुढे तालुका कृषी अधिकारी शेतकरी असल्याचा दाखला देण्यास सक्षम असतील व महिलांची अडवणूक होऊ नये अशा आशयाच्या सूचना राज्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सदर दाखल्याचा उपयोग फक्त महिलांना शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये सामील होण्यासाठी मर्यादित स्वरूपाचा असेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।