सहायक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !!

सहायक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !!

    नासिक::-आलोसे सचिन माणिकराव चव्हाण, वय ४८ वर्ष पद सहाय्यक अभियंता (वर्ग- 2)  महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, घोटी व वैतरणा विभाग यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.


        यातील तक्रारदार यांचे वॉटर प्यूरिफिकेशन प्लांट येथे सद्यस्थितीत असणाऱ्या इलेक्ट्रिसिटी मीटरवर वाढीव लोड मंजूर करून देण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे ४००००/- रुपये लाचेची मागणी करून ४००००/- रुपये लाचेची रक्कम ही पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहात मिळून आले म्हणून आलोसे यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
         सापळा अधिकारी अभिषेक पाटील, सापळा पथक सहायक पोलिस उपनिरीक्षक सुखदेव मुरकुटे, पोलिस नाईक प्रणय इंगळे यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
पोलीस अधीक्षक, नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।