१२००० रुपयांची लाच स्वीकारताना दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

१२००० रुपयांची लाच स्वीकारताना दोघे  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

    नासिक::- भुसावळ येथील आलोसे रविंद्र लक्ष्मण धांडे , वय-५४ वर्ष, कोतवाल, सजा तलाठी भुसावळ हल्ली नेमणूक तहसिल कार्यालय, भुसावळ (वर्ग-४) व खाजगी इसम हरिष देविदास ससाणे, वय-४४ वर्ष, रा. भुसावळ यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

        यातील तक्रारदार यांनी सन २०२२ मध्ये  ता . भुसावळ  जि . जळगांव  मधील कुऱ्हे पानाचे या गावात स्वतःच्या नावे  सु .२ एकर. शेतजमीन विकत घेतली आहे. सदर शेत जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर तक्रादार यांचे  स्वतःचे नावं लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालय कुऱ्हे पानाचे येथे प्रकरण सादर केले होते. सदर प्रकरणात भुसावळ मंडळ अधिकारी योगिता पाटील यांनी त्रुटी काढून तक्रारदार  यांना भुसावळ तहसील कार्यालयाचे कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटण्यास सांगितले होते. त्या प्रमाणे तक्रारदार हे कोतवाल रवींद्र धांडे यांना  भेटले असता त्यांनी तक्रारदार यांना मी तुमचे  ७/१२ च्या उताऱ्यावर नावं मंडळ अधिकारी  योगिता पाटील यांच्या कडून करून आणतो असे सांगून १५००० रुपयांची मागणी केली  त्या बाबत तक्रारदार यांनी आज दिनांक १८ एप्रिल २०२३ रोजी ला. प्र. वि.जळ्गाव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारी च्या अनुषंगाने  पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील  आलोसे रविंद्र धांडे यांनी पंचासमक्ष तक्रारदार  यांच्या कडे प्रथम १५००० रु.व तडजोडीअंती १२००० रु. लाच रकमेची मागणी करून यातील खाजगी इसम हरिश ससाणे यांचे कडे देण्यास  सांगितले यातील, खाजगी इसम आरोपी यांनी  तक्रारदार यांचे कडून १२००० रुपये आलोसे धांडे यांच्या साठी स्वतः पंचा समक्ष स्वीकारले  असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. वर  नमूद दोन्ही इसमा विरुद्ध भुसावळ शहर  पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची  कारवाई सुरु आहे.
        तपास अधिकारी संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि.जळगांव पथक स.फौ./दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, सह कारवाई मदत पथक
स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल पाटील 
पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,  पोलीस अधीक्षक, एन.एस.न्याहळदे अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।