पाच महिन्यापासून फरार असलेले दोन्ही आरोपी ५३ लाखाच्या रोखरकमेसह पोलिसांनी केले जेरबंद !

पाच महिन्यापासून फरार असलेले दोन्ही आरोपी ५३ लाखाच्या रोखरकमेसह पोलिसांनी केले जेरबंद !
         नासिक (प्रतिनिधी)::- १५ नोव्हेंबर २०२२ रोजी ज्येष्ठ नागरिकास ६६ लाख ५० हजार रुपये बंदुकीचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. होलाराम कॉलनी, आंबेडकर चौक येथील ज्येष्ठ नागरिक कन्हैयालाल तेजसदास मनवानी यांचा कारचालक देविदास मोहन शिंदे यानी व कारमध्ये बसलेला त्याचा साथीदार यांनी आपसात संगनमत करून कन्हैयालाल मनवाणी यांचे छातीला रिवाल्वर लावून त्यांचे जवळील ६६ लाख ५० हजार रुपये रोख असलेली कापडी पिशवी व मारुती कार क्रमांक एम एच १५ जीएफ ९५६७ बळजबरीने चोरी करून पळून गेले होते. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, सदर गुन्ह्याचा तपास गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा करणाऱ्याचा शोध घेऊन त्यांना अटक करणे बाबत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहा.पोलीस आयुक्त  वसंत मोरे अशांनी गुन्हे शाखा  युनिट क्रमांक एक, दोन व मध्यवर्ती गुन्हे शाखा अशांना सतत सूचना देत त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ व गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण वाघमारे, प्रवीण म्हसदे, संदीप भांड, नाझिमखान पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे, योगीराज गायकवाड, मुक्तार शेख, यांनी आरोपी युवराज मोहन शिंदे (३७), देविदास मोहन शिंदे (२६) यांचा गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने माहिती काढून त्यांचा पाठलाग करून कोल्हापूर, पुणे, कात्रज येथे शोध घेत असताना सदरचे आरोपी हे नाशिक मध्ये सातपूर परिसरात आल्याची पोलिस अंमलदार प्रवीण वाघमारे यांना खात्रीशीर बातमी मिळाली असता वरील नमूद पथकातील पोलिस अंमलदार  यांनी त्यांची गुन्हे तपासाची चक्रे नाशिकचे दिशेने फिरवून सातपूर परिसरात येऊन आरोपींना त्यांच्या ताब्यातील फोक्सवॅगन कारसह ताब्यात घेतले व पोलिसांनी गुन्हे तपासाचे कौशल्य वापरून सखोल विचारपूस केली असता सदरचा गुन्हा संगनमताने केल्याची कबुली आरोपींनी दिली.

आरोपींकडून चोरी केलेल्या रोख रकमेपैकी ५३ लाख रुपये रोख तसेच चोरीच्या रकमेतून विकत घेतलेली वोक्सवॅगन कार व तीस हजार रुपये किमतीचा मोबाईल, एक ट्रॅव्हलिंग बॅग असा एकूण ५७ लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मिळून आलेल्या इसमांना गुन्ह्याचे पुढील तपास व कारवाईकामी सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरचा सदरचा गुन्हा उघडी सांगणाऱ्या पथकाला पंधरा हजार रुपयांचे बक्षीस उपायुक्त यांनी जाहीर केले असून पथकातील सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।