जेव्हा झोपडीतील गरीबाच्या मुलाची आमदारकीसाठी मान्यवरांकडून शिफारस केली जाते ! तिकीट घोषित करायला अजून थोडा अवकाश असला तरी मी तरी आनंदाने या मुलासाठी सकारात्मक असेल-चंद्रकांत पाटील !! खालील लिंकवर क्लिक करून सविस्तर वाचा, त्याच कर्तृत्ववान , जिगरबाज मुलाच्या शब्दांत !!!

तुळजापूर विधानसभा
एक पाऊल अजून पुढे!
योगेश केदार यांच्याच शब्दांत ! ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
               चंद्रकांत दादांची आज मुंबईमध्ये भेट झाली. छत्रपती संभाजीराजेंनी माझ्या उमेदवारीसाठी मोहीमच उघडली आहे. श्रीमंतासाठी तर कुणीही शिफारस करेल, पण एक झोपडीत राहणाऱ्या गरीबाच्या मुलासाठी आमदारकीची शिफारस मी करतोय. दादा महाराष्ट्रामध्ये हक्काने मी योगेश केदार चीच सीट मागतोय. मुख्यमंत्री देवेंद्रजीना सुद्धा मी बोललोय. आज पर्यंत मी भाजप कडे काहीच मागितलं नाही, यापुढेही मागणार नाही. अश्याप्रकारे,  माझ्या विषयी राजे आणि दादा जवळपास अर्धा तास चर्चा करत होते.
          राजेंनी दादांना सांगितलं की, दिल्लीमध्ये राहून खूप मोठमोठी कामे योगेश नी केली आहेत. जिल्ह्यासाठी सुद्धा अनेक मोठे प्रकल्प घेऊन जाण्यासाठी त्याची धडपड चालू असते. रेल्वे , पासपोर्ट कार्यालय, पाईपलाईन ने गॅस पुरवठा योजना, २१ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न, तुळजाभवानी मंदिरासाठी १.५० कोटी रुपये केंद्रशासनाकडून मंजूर(तत्वतः) केले आहेत.
         अनेक देशांच्या राजदूतांसोबत वैयक्तिक संबंध प्रस्थापित याने केले आहेत. प्रशासकीय अनुभव सुदधा आता वाढला आहे. तालुक्याच्या आणि एकंदरीतच मराठवाड्याच्या भवितव्यासाठी योगेश सारख्या तरुणांना पुढे आणण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.
वय लहान असलं तरी अनुभव दांडगा आहे.
           चंद्रकांत दादा सुद्धा आश्चर्याने माझ्याकडे पाहतच राहिले. काही वेळाने माझी उत्सुकतेने विचारपूस देखील केली. (त्यांना सुरुवातीला मी एका मंत्र्याला झापलेला धाडशी मुलगा एवढाच माहिती होतो.)  राजे, तिकीट घोषित करायला अजून थोडा अवकाश असला तरी मी तरी आनंदाने योगेश साठी सकारात्मक असेल. अश्या तरुणांची पक्षाला सुद्धा गरज आहे. आपण निश्चिंत राहा. यापुढे आम्ही निर्णय करणार आहोत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!