चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही ! - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही !

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801

            मुंबई, दि. २० : चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही,” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


            यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतआमदार भरत गोगावलेसमाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरेजिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसेबार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभियेपोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व इतर मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर चवदार तळ्यासाठी देखील जल शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे यावेळी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रक्तातही भ्रष्टाचार? कथित बनावट ब्लड प्लाझ्मा रॅकेट उघडकीस आल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशातील रक्तदाते, रुग्ण, डॉक्टर आणि समाजमन हादरले !

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा १५वा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२६,

युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता हातात हात घालून हदयास हदय जोडून बंधू सहाय्याला लाहो बलसागर भारत होवो - साने गुरुजी