अध्यात्मिकता अन् कलेेमुळे ‘चिमुकल्याची’ कॅन्सरवर मात !


अध्यात्मिकता अन् कलेेमुळे ‘चिमुकल्याची’ कॅन्सरवर मात !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801

 ‘लोटस’ हॉस्पिटलमध्ये उमलत्या ’फुलाला’ अशीही संजीवनी : डॉ. प्रितेश जुनागडे यांच्या प्रयत्नांना यश 
           नाशिक ( प्रतिनिधी)::- ‘अ‍ॅक्यूट’ ल्युकेमिया अर्थात रक्ताचा झपाट्याने पसरत जाणार्‍या कर्करोेगावर निफाड येथील अवघ्या अकरा वर्षाच्या चिमुकल्याने डॉ. प्रितेश जुनागडे यांच्या उपचाराने यशस्वी मात केली. वारकरी संप्रदायातील पालकांचा हा पाच वर्षांचा चिमुकला पखवाज वादक असून तो स्वत:ही सुरेख वादन करत असतो. त्याची वादन कला आणि घरातील आध्यात्मिक वातावरणाने त्याच्या उपचाराला जलद प्रतिसाद मिळाला असून तो पूर्णपणे बरा झाला असल्याची माहिती डॉ. प्रितेश जुनागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

   
 याबाबत सविस्तर माहिती अशी की, निफाड तालुक्यातील एका अध्यात्मिक कुटुंबात जन्मलेल्या मुलाला रक्ताचा कॅन्सर अर्थात ‘ल्युकेमिया’ असल्याचे गेल्यावर्षी निदान झाले. येथील लोटस हॉस्पिटलचे संचालक तथा बोन मॅरो उपचार तज्ज्ञ डॉ. प्रितेश जुनागडे यांनी सर्वज्ञची बोनमॅरो चाचणी केल्यानंतर कर्करोग शेवटच्या ’टप्प्यात असल्याचे समजले. अवघ्या अकरा वर्षाच्या मुलाला रक्ताचा कर्करोग झाल्याचे समजल्यानंतरही सर्वज्ञच्या पालकांनी अत्यंत धीरगंभीरपणे आणि शांतपणे हताश न होता परिस्थिती स्वीकारुन डॉ. जुनागडे यांच्यावर विश्वास ठेवला व उपचार घेण्यास सुुरुवात केली. त्याच्यावर किमोथेरपीचे उपचार सुुरु केले. दरम्यान, मुलगा (रूग्ण) स्वत:ही उपचार काळात पखवाज वादन करुन शांतपणे उपचाराला प्रतिसाद देत असे आणि त्याचे पालक मुलाची स्थिती समजून घेऊन सकारात्मक प्रतिसाद देत राहिले. अनेक रुग्ण कर्करोग आणि त्यातही रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान होताच खचून जातात. कर्करोग म्हणजे मृत्यू नसून आधुनिक वैद्यक विज्ञानातील अत्याधुनिक उपचार, तंत्रज्ञानाधिष्ठीत उपचार पद्धती यामुळे कर्करोगावर पूर्ण पणे मात करता येते मात्र त्यासाठी रुग्ण आणि त्याच्या जवळील नातेवाईंकांनी डॉक्टरांवरील उपचारावर विश्वास ठेवण्यासह एखादी छंद, कला जोपासावी अन् दुर्दम्य इच्छाशक्तीसाठी जगण्याला आध्यात्मिक अधिष्ठान दिल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो असे डॉ. जुनागडे यांनी सांगितले.
   
  सर्वज्ञच्या बाबतीत अगदी हेच होत होते. डॉक्टरांचे अत्याधुनिक उपचार आणि रुग्णांची पखवाजवादन कला आणि पालकांचे अध्यात्मिक अधिष्ठान यामुळे सर्वज्ञचा रक्ताचा कर्करोग अवघ्या काही महिन्यातच पूर्णपणे बरा होऊन तो आता सामान्य मुलांप्रमाणे जीवन जगत आहे. आजच्या आधुनिक उपचार पद्धतीत पर्यायी मेडिसीन म्हणून रुग्णाला चित्र, शिल्प संगीत कलेची जोड दिली जाते. त्याला समांतर उपचार किंवा पर्यायी उपचार म्हटले जातात. यामुळे रुग्णांची इच्छाशक्ती, रोगावर मात करण्याची जिगीषा, अंतरीक शक्ती पूर्णपणे विकसित होण्यासह सकारात्मक विचारही विकसित होत जातात हे संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे. यासह भारतीय आध्यात्म साधना हे माणसाची इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचार वाढवण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात असेही डॉ. जुनागडे यांनी नमूद केले.
 आज सर्वज्ञ पूर्णपणे बरा झाला असून पखवाज आणि किर्तनातून आपली कला फुलवत आहे.
=============================
आधुनिक उचाराला हवी
आध्यात्म साधनेची जोड !
आज वैद्यकीय आधुनिक उपचार अत्यंत प्रभावी ठरले आहेत. उपचार पद्धती ’मल्टी फॅक्टर्स’ हव्यात. पारंपरिक उपचाराला अनेक पैलु, आयाम देता येतात. आधुनिक उपचारांना अध्यात्मिक पाया दिला आणि कला, संगीत याचीही जोड रुग्णांनी दिली तर रुग्ण सकारात्मक विचार, दुर्दम्य इच्छिशक्तीने रोगावर लवकर मात करु शकतो. आध्यात्माने मन स्थिर, शांत एकाग्र होण्यासह आहे ती परिस्थिती स्थितप्रज्ञपणे स्वीकारते त्यामुळे उपचारांचा  रुग्णावर जलद सकारातत्मक परिणाम होतो.
===========================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !