लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत तिघांना ताब्यात घेतले !

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत तिघांना ताब्यात घेतले !
तिघेही फैजपूर पोलिस ठाण्यातील !!
      जळगाव (नासिक)::-आलोसे हेमंत वसंत सांगळे, वय-५२ वर्ष, स.फौ.९१२ नेम.फैजपुर पोलीस स्टेशन ता.यावल जि.जळगाव. (वर्ग-३)
रा. भारत एंटरप्रायजेस मागे, यावल रोड, फैजपुर ता.यावल जि.जळगाव, किरण अनिल चाटे, वय-४४ वर्ष, पो.ना./९३० नेम.फैजपुर पोलीस स्टेशन ता.यावल जि.जळगाव. (वर्ग-३)

रा.विद्या नगर, फैजपुर ता.यावल जि.जळगाव,  महेश ईश्वर वंजारी, वय-३८ वर्ष, पो.ना./२०१२ नेम.फैजपुर पोलीस स्टेशन ता.यावल जि.जळगाव. (वर्ग-३) रा.लक्ष्मी नगर, फैजपुर ता. यावल जि. जळगाव यांना रुपये ४,०००/- ची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.
           तक्रारदार यांचा फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीमधील बामणोद येथे पत्त्याचा क्लब आहे. फैजपुर पोलीस स्टेशनचे बामणोद बीटचे वरील आलोसे क्रं.१ व २ यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पत्त्याच्या क्लबवर कोणतीही जुगाराची कारवाई न करता सदर जुगाराचा क्लब सुरळीत चालु राहु देण्याच्या मोबदल्यात दरमहा ४,०००/रु. प्रमाणे लाचेची मागणी केल्याबाबत तक्रार दिली होती. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी आज तक्रार देवून फैजपुर पोलीस स्टेशन येथे जावून वरील दोन्ही आरोपीतांची भेट घेण्यास गेले असता त्यांना वरील आलोसे क्रं.१ हे भेटले त्यांनी तक्रारदार यांचेकडे कामाची व पैशाची बोलणी करून आलोसे क्रं.१ यांनी त्यांचे मोबाईल फोनवरून आलोसे क्रं.२ यांना फोन करून तक्रारदार हे देत असलेल्या पैशांबद्दल बोलणी करून किती पैसे घ्यायचे याबाबत स्वतः बोलणी करून तक्रारदार यांचेकडे फोन देवून तक्रारदार व आलोसे क्रं.२ यांचे बोलणे करून दिले.आलोसे क्रं २ यांनी त्यांचे फोनवरून आलोसे क्रं १ यांच्या फोनवर बोलून लाचेच्या रक्कमेत तडजोड करून सदर लाच रक्कम आलोसे क्रं.१ यांचेकडे देण्यास सांगितले. त्यानुसार आलोसे क्रं १ यांनी तक्रारदार यांचेकडे स्वतःसाठी व आलोसे क्रं.२ यांचेसाठी ३,०००/- रुपये लाचेची मागणी करून पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेतील अंमलदारांसाठी १,०००/-रु.अशी एकुण दरमहा ४,०००/रु.प्रमाणे लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम आलोसे क्रं.१ यांनी पंचासमक्ष स्वतःस्विकारून आलोसे क्रं.३ यांचेजवळ दिली असता आलोसे क्रं.३ यांना सदर रक्कम पत्त्याचा क्लब सुरळीत चालु देण्यासाठीची माहिती असतांना त्यांनी ती लाच रक्कम स्वीकारली. म्हणून तीन्ही आरोपीतांविरुद्ध फैजपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
        सापळा पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. सापळा व तपास अधिकारी एस.के.बच्छाव, पोलिस निरीक्षक, यांच्यासह स.फौ.दिनेशसिंग पाटील,पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने यांच्या पथकाने कारवाई केली 
        कारवाई मदत पथकात एन.एन.जाधव, पोलिस निरीक्षक, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर होते.
        सर्वश्री श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. एन.एस.न्याहळदे अप्पर पोलीस अधिक्षक, नरेंद्र पवार वाचक पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।