गोविंद बोरसे व प्रविण अलई यांची महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड… !

गोविंद बोरसे व प्रविण अलई यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड…

 न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801

नाशिक(प्रतिनिधी)::- भाजपा विभागीय प्रसिध्दी प्रमुख गोविंद बोरसे व भाजपा प्रदेश सोशल मिडीया, माजी संयोजक प्रविण अलई यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड झाल्याची माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे यांनी प्रदेश कार्यालयातून  प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले.


या निवडीबद्दल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण  राज्यमंत्री डॉ. भारती पवार, नामदार गिरीष महाजन, खा.उन्मेश पाटील, खा.सुभाष भामरे, खा. हिना गावित, प्रदेश उपाध्यक्ष जयकुमार रावल, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ.राम शिंदे, आ.श्रीकांत भारतीय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्य विभाग व प्रसिध्दी प्रमुख नवनाथ बन, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष केदा आहेर, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, सुनिल केदार, तसेच शहर, मंडल, उत्तर महारष्ट्रातील भाजपा आमदार, खासदार, पदाधिकारी विविध आघाड्या, प्रकोष्ट, मोर्चे यांच्या पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. निवडीचे पत्र मिळाल्यानंतर गोविंद बोरसे व प्रविण अलई यांनी सांगितले की पक्षाच्या धेय धोरणांचे पालन करून पक्षाकडून आलेले विविध विषय माध्यमातून जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचवू.

                 दरम्यान २०१२ पासून गोविंद बोरसे यांनी शहर प्रसिध्दी प्रमुख, सोशल मिडीया प्रदेश सह संयोजक तसेच विभागीय प्रसिध्दी प्रमुख आदी पदांवर परिणामकारक रित्या काम केले. हे कार्य डोळयापुढे ठेवून भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर विश्वास टाकून भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड केली. तर प्रविण अलई यांनी हि जिल्हा सोशल मिडीया संयोजक, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख, विभागीय सोशल मिडीया सह संयोजक, महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडीया संयोजक आदी पदावर यशस्वी काम केले म्हणून त्यांना त्यांच्या कार्याचा अनुभव बघता प्रदेश प्रवक्तेपदी निवड करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !