वेगवान आणि गतिमान म्हणणाऱ्या सरकारला ब्रेक लावण्यात प्रशासन मश्गुल !

वेगवान आणि गतिमान म्हणणाऱ्या सरकारला ब्रेक लावण्यात प्रशासन मश्गुल !
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801
       नासिक::- "निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान" असे घोषवाक्य घेऊन महाराष्ट्र सरकार काम करीत आहे, नुकताच महिलांना प्रवास भाड्यात ५० % सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे प्रत्यक्षात महामंडळाचे  आर्थिक नुकसान होत असले तरीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढल्यास अप्रत्यक्षपणे शासनाच्या महसूलात वृद्धी होईल, खाजगी वाहनांचा वापर थोडाफार कमी होऊन इंधनासह अनुषांगिक खर्चावर मर्यादा येणार.

मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही तितकी सक्षम असायला हवी याकडे प्रशासनाची डोळेझाक होऊ नये,

अधिवेशन काळात खिडक्या व तावदाने तुटलेल्या बसवर शासकीय जाहिरात झळकविली तो विषय चवीने चर्विला गेला त्यावर कडी करत शिवशाही बसचा चालकाला पाठीमागील वाहनांची तथा बसच्या मागील स्थितीचा अंदाज समजण्यासाठी असलेला आरसा चक्क कापडाच्या तुकड्यांनी बांधण्याचा पराक्रम किती धोकादायक व चालक-वाहक यांच्यासह सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवावर बेतला तर मोठा अनर्थ घडू शकतो याची सुतराम कल्पना प्रशासनाला येऊ नये हे दुर्दैवच म्हणावे लागेल. सरकारची गतिमानता ही सर्वस्वी प्रशासनावर अवलंबून असल्याने या अशा किरकोळ दिसणाऱ्या मात्र घटनेनंतर महत्वाच्या ठरणाऱ्या बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष अपेक्षित नाही. याची दखल मुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री घेतील व प्रशासनाला आपला कारभार सुधारण्यासाठी आदेश देतील काय असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।