अल्पवयीन मुलांनी रस्त्यांवर वाहन चालविल्यास पालकांवर होणार दंडात्मक कारवाई ! प्रदीप शिंदे

अल्पवयीन मुलांनी रस्त्यांवर वाहन चालविल्यास पालकांवर होणार दंडात्मक कारवाई ! प्रदीप शिंदे

नाशिक, दि.२८ (जिमाका वृत्तसेवा)::-अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यांवर वाहने चालविल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अठरा वर्षाखालील मुलांना विना परवाना वाहन चालविण्यास पालकांनी परवानगी देवू नये. अन्यथा पालकांवर शिक्षा व दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी कळविले आहे.

          मोटार वाहन कायद्यांतर्गत १६ वर्षाखालील मुलांनी वाहन चालविण्याचा गुन्हा केला तर गुन्ह्यामध्ये दोषी आढळणाऱ्या मुलांच्या पालकांना तीन वर्ष कारावास व २५ हजार रूपये दंडाची तरतुद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाहन चालविण्याचा परवाना नसतांना वाहन चालविल्यास चालकास रूपये ५ हजार व वाहन मालकास ५ हजार असा एकूण १० हजार रूपये दंड व शिक्षेची तरतुद मोटर वाहन कायद्यात करण्यात आली आहे.
        प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने याबाबत वायुवेग पथकामार्फत जिल्हा व शहरात जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. १८ वर्षाखालील मुलांना वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे त्यांना वाहन चालविण्याची परवानगी देण्यात येवू नये, असे प्रबोधन प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक येथील अधिकारी वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयात जाऊन करीत आहेत. तरी पालकांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन प्रदिप शिंदे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक घटना. 'ग्रेट व्हाइट पेलिकन (रोजी पेलिकनचे) नांदूर मध्यमेश्वरमध्ये आगमन !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!