२० लाखांची लाच स्वीकारताना दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

२० लाखांची लाच स्वीकारताना दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

     नाशिक::- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात आज निफाड तालुका सहायक निबंधकासह लिपिक गळाला लागला आहे. गेल्या वर्षातील एसीबीची ही मोठी कारवाई ठरली आहे. सहकार विभागांतर्गत निफाड तालुका सहायक निबंधक २० लाखाची लाच घेताना एसीबीच्या पथकाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडला आहे. लाच स्वीकारताना तालुका निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाचाही सहभाग दिसून आल्याने सहायक निबंधकासह वरिष्ठ लिपिकाला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. लाचलुचपत विभागाकडून प्राप्त माहितीनुसार लाचखोर सहाय्यक निबंधक आलोसे रणजित महादेव पाटील व वरिष्ठ लिपिक आलोसे प्रदीप अर्जुन वीर नारायण यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तक्रारदारावर सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी पाटील याने २० लाख रुपयांची लाच मागितली होती. या सर्व प्रकारात वरिष्ठ लिपीक वीरनारायण याचाही सहभाग असल्याची तक्रार आलेली होती.  त्यानुसार एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी सापळा रचण्यात आला व दोघा आलोसे यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !