शाळा आणि रुग्णालयांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा !

शाळा आणि रुग्णालयांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा !
  न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801      
     मुंबई::- राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्याचा फायदा झाला असून पूर्वीच्या तुलनेत कॉपीचे प्रकार कमी झाले असल्याचे  फडणवीस यांनी सांगितले. तीन हजार शाळांची वीज तोडण्यात आली असून देयक अदा केल्यानंतर ती पूर्ववत होईल.

यापुढे शाळा आणि रूग्णालयांना पब्लिक सर्व्हिस या नावाने सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. एच3 एन2 बाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला असून राज्य शासनाची आरोग्य यंत्रणा दक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

गिरणी कामगारांच्या घरांसाठी उपलब्ध जमिनीचा शोध घेऊन म्हाडामार्फत बांधकाम करण्यात येईल. त्याचप्रमाणे डबेवाल्यांकरिता घरे देण्याबाबत देखील पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।