मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801

मुंबई, दि. २५ : राज्यातील मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. 


       मातंग समाजाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक झाली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ. सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, मातंग समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.

            मातंग समाज योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यांमध्ये जनजागृती शिबीरे आयोजित करावी. समाजाच्या विविध मागण्यांबाबत संघटनांसोबत जिल्हानिहाय बैठका घेवून समस्या सोडवाव्यात. योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्यांची यादी तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक न्याय विभागाला दिले.

            सद्यस्थितीत मातंग समाजाच्या विकासाच्या योजनांसाठी निधी उपलब्ध आहे. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, रोजगार व स्वयंरोजगार, कर्ज पुरवठा आदी सोयीसुविधा मातंग समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी विभागाला दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रक्तदानाचे दीड शतक पूर्ण करणारा सेवाव्रती पत्रकार. विश्वविक्रमी रक्तदाते पत्रकार डॉ.दिलीप केदारनाथ कोठावदे यांचा प्रेरणादायी, भावस्पर्शी रक्तदान प्रवास

रविवारी मविप्रची ११२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा : सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. १,२२९ कोटींचे विक्रमी अंदाजपत्रक, ६०० हून अधिक सामंजस्य करार, ७,६१४ विद्यार्थ्यांना रोजगार......

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा बहिस्थ परिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !