नायब तहसीलदार लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

नायब तहसीलदार लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

    जळगाव (न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक)::- आलोसे जयवंत पुंडलीक भट , वय-५१ वर्ष, नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय, धरणगाव ता.धरणगाव, जि.जळगाव. (वर्ग-२) रा.काळकर गल्ली,एरंडोल ता.एरंडोल जि.जळगाव,  राहुल नवल शिरोळे, वय-३०, कोतवाल, पाळधी तलाठी कार्यालय , ता.धरणगाव, जि.जळगाव. रा.पाळधी, ता.धरणगाव जि.जळगाव. (वर्ग-४) यांनी तक्रारदार पुरूष, वय २७ रायसोनी नगर, जळगाव यांचेकडे प्रथम ३०,०००/-रू लाचेची मागणी केली, तडजोडीअंती २५,०००/-रु . लाच स्विकारली असता लाचेची रक्कम पंचासमक्ष हस्तगत करण्यात आली.

         यातील तक्रारदार यांचे भावाचे नावे दोन ढंपर वाहन असुन सदर ढंपर वाहनाने ते वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतात. दोन ढंपर वाहनांपैकी एक ढंपर वाहन हे एरंडोल तहसिल कार्यालय येथे जमा आहे. तसेच यापूर्वी देखील ढंपर अडवून जागेवरच सोडून देण्यासाठी तक्रारदार यांचेकडून दि.०१/०३/२०२३ रोजी ३०,०००/- रुपये व दि.११/०३/२०२३ रोजी २३,०००/- रुपये असे आलोसे क्रं.१ यांनी जागेवरच घेतलेले आहेत. त्यानंतर आलोसे क्रं.१ यांचे सांगितल्याप्रमाणे तक्रारदार यांनी आलोसे क्रं.२ यांची भेट घेतली असता तक्रारदार यांनी एरंडोल तहसिल कार्यालय येथे जमा असलेले ढंपर व दुसरे वाळू वाहतूक सुरू असलेले ढंपर असे तक्रारदार यांचे दोन्ही ढंपर वाहनांनी धरणगाव हद्दीमधुन वाळू वाहतूकीचा व्यवसाय कारवाई न करता चालु देण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे आलोसे क्रं.२ यांनी प्रत्येकी ढंपरचे १५,०००/- रुपये प्रमाणे दोन्ही ढंपरचे प्रथम ३०,०००/-रुपये व तडजोडीअंती २५,०००/- रुपये लाचेची मागणी केली. तसेच याबाबत आलोसे क्रं.२ यांनी त्यांचे मोबाईल फोनवरून तक्रारदाराची आलोसे क्रं.१ यांचेशी बोलणी करवून दिली असता आलोसे क्रं.१ यांनी वर नमुद प्रमाणे लाचेची मागणी करून मागणी केलेली रक्कम आलोसे क्रं.२ यांचेकडे देण्यास प्रोत्साहन दिले व त्याप्रमाणे मागणी केलेली २५,०००/-रुपये लाच रक्कम आलोसे क्रं.२ यांनी पंचासमक्ष पाळधी पोलीस दुरक्षेत्राच्या बाजुस असलेल्या रस्त्यावर स्वीकारली म्हणून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे व आलोसे क्रं.१ यांना तहसिल कार्यालय धरणगाव येथून ताब्यात घेण्यात आले. वरील दोन्ही आरोपीतांविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदर कार्यवाही श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव, सापळा व तपास अधिकारी एन.एन.जाधव, पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव व सापळा पथक एस.के.बच्छाव, पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. स.फौ.दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.राकेश दुसाने यांनी केली. कारवाईतील मदत पथकात स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा. पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

महिला शिक्षणाधिकारी व लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

पोलिस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !