गरोदर अधिकारी यांची अशीही कर्तव्यसिद्धी !प्रशासकीय व सामाजिक थरांतून कौतुक !!

गरोदर अधिकारी यांची अशीही कर्तव्यसिद्धी !
प्रशासकीय व सामाजिक थरांतून कौतुक !!

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्याला सलाम !!

    म्हाळसाकोरे::- येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पवार ह्या स्वतः गरोदर असतानाही वेळेची गरज ओळखून एका तातडीच्या रुग्णाला रूग्णवाहिकेचे चालक रजेवर असल्याने स्वतः  प्राथमिक आरोग्यकेंद्राची रूग्णवाहिका चालवत विष प्राशन केलेल्या रुग्णाला निफाड येथे ग्रामीण रुग्णालयात घेवून गेल्या आणि उपचार सुरू केले.

मांजरगाव येथील २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन केले असल्याने त्याचेवर तातडीने उपचाराची गरज होती, त्याला तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळसाकोरे येथे प्राथमिक उपचार केले व रुग्णाला तातडीने पुढील संदर्भ सेवेची आवश्यकता असताना प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळसाकोरे येथील वाहनचालक रजेवर असल्याने बाका प्रसंग उद्भवला होता, याप्रसंगाला सामोरं जाण्यासाठी एक स्त्री त्यातही गरोदर असूनही स्वतःचा विचार न करता आरोग्य सेवक संसारे यांना सोबत घेवून रुग्णवाहिका चालवत ग्रामीण रुग्णालय निफाड येथे तातडीने रुग्णाला पोहचवून वेळेत पुढील उपचार सुरू झाला. या धाडसी कृतीचे कर्मचारी, नागरिकांकडून वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पवार यांचे कौतुक करण्यात येत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे व किटकनाशके पुरवावी- सुनिल बोरकर, गुण नियंत्रण संचालक, कृषी आयुक्तालय.

उल्लेखनीय::- सगळीकडे उन्हाची तीव्रता जाणवत असतानाही तालुक्यात आजपर्यंत एकही टँकर चालू नाही, तालुक्यात कुठल्याही ग्रामपंचायतचा पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव आलेला नाही.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !