विश्वस्तांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू, अर्ज करण्याचे आवाहन !

विश्वस्तांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू, अर्ज करण्याचे आवाहन !

न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक,

त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरु !
     नाशिक (विमाका वृत्तसेवा)::-त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचा कालावधी ३ जुलै, २०२३ रोजी संपुष्टात येत असून विश्वस्त मंडळामध्ये ४ भाविक प्रतिनिधी विश्वस्तांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्याअनुषगांने इच्छुक, योग्य व पात्र व्यक्तिंनी नेमणुकीकरिता विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह धर्मादाय सह आयुक्त कार्यालय, जानकी प्लाझा, पहिला मजला नाशिक - पुणे रोड, नाशिक येथे करावा, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक शि.ना.दुतोंडे यांनी केले आहे.


        विश्वस्त मंडळामध्ये ४ भाविक प्रतिनिधी विश्वस्तांची नेमणुकीबाबतची अधिसूचना २६ मे, २०२३ रोजी जारी करण्यात आली आहे. सदरची अधिसूचनेची एक प्रत, अर्जाचा विहीत नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी धर्मादाय सह आयुक्त कार्यालय, नाशिक, त्र्यंबकेश्वर देवस्थान, त्र्यंबकेश्वर नगर परिषद आणि महानगरपालिका, नाशिकच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!